मेलबर्न : आगामी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचा समावेश असून पहिल्या फेरीत त्याच्यापुढे सर्बियन सहकारी मोओमिर केस्मानोव्हिचचे आव्हान असेल. मात्र, अजूनही त्याच्या या स्पर्धेतील सहभागाबाबत संभ्रम कायम आहे.

लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्यावर मागील आठवडय़ात मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला. मात्र, जोकोव्हिचने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने सरकारचा निर्णय मागे घेतला. परंतु परकीय नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांना (इमिग्रेशन मिनिस्टर) जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे.

युकी, अंकिता पात्रता फेरीत गारद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या युकी भांब्रीला पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. युकीला चेक प्रजासत्ताकच्या टोमास मॅकहॅकने १-६, ३-६ असे पराभूत केले. महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत २०३व्या स्थानी असलेल्या अंकिता रैनावर युक्रेनच्या लेसिया त्सुरेंकोने ६-१, ६-० अशी सहज मात केली. युकी आणि अंकिताच्या पराभवांमुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.