काही आठवड्यांपूर्वीच निवृत्ती जाहीर करणारे भारतीय हॉकीपटू रुपिंदर पाल सिंग आणि बिरेंद्र लाक्रा यांचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास पत्राद्वारे कौतुक केले. रुपिंदर आणि लाक्रा या दोघांनीही यासंबंधी ‘ट्वीट’ करत माहिती दिली.

‘‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र मिळाले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रेरणा दिली. त्यांची खेळाविषयीची आवड वाखाणण्याजोगी आहे. यापुढेही मी भारतीय क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान देत राहीन,’’ असे रुपिंदर म्हणाला.

‘‘पंतप्रधान मोदी यांचे पत्र वाचून देशाचे नाव उज्ज्वल केल्याचे समाधान मिळाले. टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर मोदी यांच्यासह घालवलेला वेळ कायमस्वरूपी स्मरणात राहील,’’ असे लाक्राने नमूद केले. लाक्रा आणि रुपिंदर यांनी युवा खेळाडूंना संधी देण्याच्या हेतूने ३० सप्टेंबर रोजी निवृत्ती जाहीर केली. दोघेही टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाºया भारतीय संघाचा मोलाचा भाग होते.