Rohit Sharma complains about Sunil Gavaskar : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (बीजीटी) २०२४-२५ दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय कसोटी कर्णधार रोहित शर्मासाठी हा कठीण काळ होता. फलंदाजी आणि कर्णधार या दोन्ही आघाड्यांवर त्याची कामगिरी खूपच खराब राहिली. पहिली कसोटीत न खेळल्यानंतर तो दुसऱ्या कसाटीपूर्वी संघात सामील झाला. न्यूझीलंडविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या रोहितला ऑस्ट्रेलियातही विशेष काही करता आले नाही. या मालिकेत संघाला १-३ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने पर्थमधील एकमेव सामना जिंकला होता.

रोहित शर्माला तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ ३१ धावा करता आल्या. या काळात त्याची सरासरी केवळ ६.०० होती. या खराब कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या फलंदाज आणि कर्णधार या दोन्हीच्या दृष्टिकोनाबद्दल टीका केली. सुनील गावस्करांनी सिडनी कसोटीत त्याच्या अनुपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचबरोबर कसोटीतील कर्णधारपद अन्य कोणत्या तरी खेळाडूकडे सोपवण्याच्या सल्ला दिला होता.

क्रिकब्लॉगरच्या वृत्तानुसार, सुनील गावस्करांनी केलेली टीका कर्णधार रोहित शर्माला आवडली नाही. हिटमॅनला ही टीका अयोग्य असल्याची वाटल्याने त्याने बीसीसीआयकडे सुनील गावस्करांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर बाह्य परिस्थितीमुळे आपल्या कामगिरीवर परिणाम झाल्याचेही रोहित शर्मा म्हणाला आहे.

रोहितने सुनील गावस्करांची बीसीसीआयकडे केली तक्रार –

या प्रकरणाशी निगडित असलेल्या एका सूत्राने खुलासा केला की, “रोहितला वाटले की सुनील गावस्करांनी अशा प्रकारे टीका करणे आवश्यक नव्हते. त्यामुळेच त्याने बीसीसीआयकडे गावस्करांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या सगळ्याचा इतका दबाव आला की त्याला हे बीसीसीआयला सांगावे लागले. मालिकेदरम्यान एका सामन्यात खराब शॉट्स खेळणाऱ्या ऋषभ पंतला गावस्कर ‘स्टुपिड’ म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील गावसकर पंतला म्हणाले होते स्टुपिड –

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने स्कॉट बोलंडच्या चेंडूवर आपली विकेट गमावली होती. त्यावेळी २८ धावांवर फलंदाजी करत होता. पंतने बोलंडच्या चेंडूला सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न केला, पण नॅथन लायनने त्याचा झेल घेतला. यानंतर गावस्कर संतापले. एबीसी स्पोर्ट्ससाठी समालोचन करताना सुनील गावस्कर रागाने म्हणाला, “स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड.” तिथे दोन क्षेत्ररक्षक असताना तुम्ही तरीही अशा प्रकारे शॉट्स कसा खेळू शकता?तुम्हाला आधीचा शॉट पण नीट खेळता आला नव्हता. तुम्ही कुठे झेलबाद झाला, हे पहावं लागेल. हे एक प्रकारे विकेट फेकणे आहे.