Sachin Tendulkar Gives Team India Jersey To Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, २३ सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये भगवान शिव-थीम असलेल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. १२१ कोटी रुपयांच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियमसाठी सुमारे ३३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या या पायाभरणीच्या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींना दिली खास जर्सी –

वाराणसीमध्ये आयोजित या मोठ्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ, पीएम मोदी, सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतर क्रिकेटपटू मंचावर उपस्थित होते. त्यानंतर सचिने तेंडुलकरने नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली. या जर्सीच्या समोरील बाजूवर टीम इंडिया लिहिलेले आहे, तर मागे ‘नमो’ असे नाव लिहले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुनील गावस्कर आणि कपिल देवही उपस्थित होते.

२०२५ पर्यंत स्टेडियमचे काम पूर्ण होण्याची शक्यता –

या स्टेडियमची आसन क्षमता अंदाजे ३०,००० असेल आणि त्यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण, त्रिशूळाच्या आकाराचे फ्लडलाइट्स आणि वेलीची पाने आणि डमरू सारख्या रचना यासारखे अद्वितीय डिझाइन घटक असतील. स्टेडियमच्या डिझाइनचा उद्देश काशीचे सार टिपणे आहे. प्रेक्षक गॅलरी हे वाराणसीच्या घाटांच्या पायऱ्यांसारखे दिसते. हे स्टेडियम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Gautam Gambhir: गंभीरने नवीन उल हकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताच विराट कोहलीचे चाहते संतापले, जाणून घ्या कारण

हे देशातील ५४वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. आत्तापर्यंत भारतात ५३ वेगवेगळ्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश स्टेडियम आता बंद झाले असून काहींचे नूतनीकरण सुरू आहे. वाराणसीच्या गंजरी येथे हे स्टेडियम ४५० कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेडियमच्या पायाभरणी व्यतिरिक्त, पीएम मोदींनी वाराणसीमध्ये महिला समर्थकांच्या रॅलीला संबोधित केले. त्याचबरोबर संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह उपस्थित होते. कानपूर आणि लखनौनंतर उत्तर प्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असणार आहे.