scorecardresearch

IND vs AUS Final: “अतिआत्मविश्वास तुम्हाला…”, टीम इंडियाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ VIDEO व्हायरल

Shahid Afridi Viral Video : एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
शाहिद आफ्रिदी आणि रोहित शर्मा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shahid Afridi’s Statement About Team India: जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात फलंदाजी करत होती, तेव्हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने लाइव्ह टीव्हीवर एक विधान केले होते. तो भारतीय फलंदाजांबद्दल म्हणाला होता की, कधी कधी अतिआत्मविश्वास तुम्हाला महागात पडतो. फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘समा टीव्ही’वरील चर्चेदरम्यान हे वक्तव्य केले होते. येथे त्याच्यासोबत मोहम्मद युसूफही पॅनेलमध्ये उपस्थित होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारतीय डाव अडचणीत असताना आफ्रिदीने भारतीय फलंदाजांवर निशाणा साधला होता. शाहिद आफ्रिदीचे हे विधान शुबमन गिल निष्काळजीपणे फटकेबाजीवर आणि रोहित शर्मा अनावश्यक शॉटवर बाद झाल्यानंतर आले होते.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
World Cup 2023: “मला माहित नाही की हा संघ…”; विश्वचषकापूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाच्या एकजुटीवर उपस्थित केला प्रश्न
Pakistan vs Netherlands Cricket Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: बाबर आझम वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला फ्लॉप, सोशल मीडियावर युजर्सनी उडवली खिल्ली
The name is enough Yuzvendra Chahal said a big thing by tweeting about Ravichandran Ashwin's bowling
Yuzvendra Chahal: आर. अश्विनची दमदार कामगिरी अन् चहलची पोस्ट आली चर्चेत; म्हणाला, “फक्त हे नावच…”
IND vs AUS: How serious is Akshar Patel's injury Team India in search of all-rounders after the match R. Ashwin Special Video Viral
IND vs AUS: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टीम इंडिया अष्टपैलूच्या शोधात, सामन्यानंतर अश्विनचा स्पेशल Video व्हायरल

सतत जिंकल्याने अतिआत्मविश्वास वाढतो –

सामन्याच्या ११व्या षटकात श्रेयस अय्यरच्या रूपाने टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली, तेव्हा अँकरने शाहिद आफ्रिदीला विचारले की, हे एखाद्या मोठ्या सामन्याचे दडपण आहे का? यावर आफ्रिदी म्हणाला, “नाही, हे मोठ्या सामन्याचे दडपण नाही. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. ते असेच वाढले आहेत. एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळत आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पूर्णपणे दबावावर आधारित असते. हे त्यांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही सतत सामने जिंकत असता, तेव्हा तुमचा अतिआत्मविश्वास वाढतो आणि ही गोष्ट तुम्हाला महागात पडते. कारण ज्या चेंडूंवर तो बाद झाला, तो चेंडू विकेट टाकण्यासारखा नव्हता.”

हेही वाचा – IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी ‘गल्ली क्रिकेट’ खेळण्यााचा घेतला आनंद, पाहा VIDEO

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा ६ विकेट्सनी पराभव –

विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिले तीन विकेट लवकर गमावल्याने टीम इंडिया दडपणाखाली दिसली. पहिल्या पॉवरप्लेनंतर विराट कोहली आणि केएल राहुलने अतिशय संथ भागीदारीत धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजही ठराविक अंतराने विकेट घेत होते. याचा परिणाम असा झाला की भारतीय संघ अवघ्या २४० धावांवर गारद झाला. यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा ४३ षटकांत सहज पाठलाग केला आणि ६ गडी राखून सामना जिंकला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahid afridi says when you keep winning matches continuously you also become overconfident this thing gets you killed vbm

First published on: 21-11-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×