scorecardresearch

Premium

World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण

Sunil Gavaskar’s statement on Suryakumar Yadav: भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत वनडेत विशेष काही केले नाही. त्यामुळे भारतीय संघात खेळण्याची संधी मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

World Cup 2023 Updates
गावसकरांच्या मते सूर्यकुमारला खेळण्यासाठी वाट पाहावी लागेल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sunil Gavaskar says Surya will have to wait to play: सूर्यकुमार यादव हा निःसंशयपणे टी-२० फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याच्याकडे मैदानाच्या प्रत्येक क्षेत्रात फटके मारण्याची ताकद आहे. सूर्यकुमारकडे कोणत्याही गोलंदाजीचे आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. देशांतर्गत सर्किट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर, मुंबईच्या फलंदाजाला खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आता तो एकदिवसीय विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या टीम इंडियाचा भाग आहे. मात्र, हा विश्वचषक सुरु होण्यापूर्वी सूर्याबाबत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सूर्यकुमार यादवबद्दल, टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांना वाटते की तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे सूर्याला एकदिवसीय विश्वचषक खेळण्याच्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल. गावसकर म्हणाले की, श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज आहे.

A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
ICC World Cup 2023: World Cup ticket increased KL Rahul's worries know why he said I will not answer to anyone
World Cup 2023: विश्वचषकाच्या तिकिटांमुळे के.एल. राहुलची चिंता वाढली; म्हणाला, “मी कोणालाच उत्तर देणार नाही…”
Gautam Gambhir praises MS Dhoni Taking the name of Hitman he said Rohit Sharma is today because of Dhoni
Gautam Gambhir: “हा विजय माझ्यासाठी…”, श्रीलंकेवरील विजयानंतर गंभीरने केले धोनीचे तोंडभरून कौतुक; म्हणाला, “आज रोहित आहे तो…”
asian cup prelims
Asian Cup: ज्योतिष्याच्या सल्ल्यानं झाली भारतीय संघाची निवड! संघप्रशिक्षकानं दिली खेळाडूंची माहिती

सूर्याला खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट –

एनडीटीव्हीवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, ‘सूर्यकुमार यादवने आतापर्यंत वनडेत मोठी कामगिरी केलेली नाही. तो फक्त शेवटच्या १५-२० षटकांमध्ये फलंदाजी करतो. ज्यामध्ये तो टी-२० क्षमतेचा उपयोग करतो. जो महत्त्वाचा आहे, परंतु हार्दिक पांड्या, इशान किशन आणि केएल राहुल देखील तेच करतात. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर सर्वोत्तम आहे.’ सुनील गावसकर पुढे म्हणाले की, ‘सूर्यकुमार यादवला वाट पहावी लागेल. मात्र, जर त्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली, तर त्याला मोठे शतक ठोकावे लागेल. तसेच आपणही शतक झळकावू शकतो, हे दाखवून द्यावे लागेल.’ ३३ वर्षीय सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती.

हेही वाचा – World Cup 2011: ‘वृत्तपत्र वाचणे, टीव्ही पाहणे बंद करा’; ‘या’ खेळाडूच्या सल्ल्यामुळे भारताने जिंकला विश्वचषक, युवराज सिंगचा खुलासा

त्याने दोन अर्धशतके झळकावली होती आणि ६५ च्या सरासरीने आणि १३९.७८ च्या स्ट्राइक रेटने १३० धावा केल्या होत्या. यामुळे सूर्यकुमारला आत्मविश्वास मिळाला असेल, पण जेव्हा टीम इंडिया ८ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पहिल्या सामन्यात कांगारू संघाशी सामना करेल, तेव्हा सूर्यकुमार यादव क्वचितच प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल. मात्र, भविष्यातील काही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी सर्व १० संघ जाहीर; पाहा कोणत्या संघात कोणाला मिळाली संधी?

सूर्यकुमार यादवने वनडेत खास कामगिरी केलेली नाही –

टी-२० नंतर सूर्यकुमार यादवला वनडेमध्ये संधी मिळाली, तेव्हा तो ज्या फॉर्मसाठी ओळखला जातो, तो फॉर्म दिसला नाही. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तो आपला आक्रमक खेळ दाखवू शकलेला नाही, ज्याच्या जोरावर त्यांनी ओळख मिळवली आहे. सूर्यकुमार यादवला वनडे फॉरमॅटमध्ये स्वत:ला अॅडजस्ट करण्यात अडचण येत असून त्याने हे मान्यही केले आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये खराब कामगिरी करूनही त्याला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले. वनडेमध्ये ५५ पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या संजू सॅमसनला प्राधान्य न देता त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunil gavaskar says suryakumar yadav will have to wait to play team india in world cup 2023 vbm

First published on: 29-09-2023 at 19:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×