Team India breaks Pakistan Team World Record : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हरारे येथे खेळला जात आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी डावाला सुरुवात केली. यशस्वी जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. मात्र, त्याच्या छोट्या खेळीमुळे भारतीय संघाने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील डावातील पहिल्या चेंडूवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता भारतीय संघाच्या नावावर आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध डावाच्या पहिल्या चेंडूवर १३ धावा केल्या. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध डावाच्या पहिल्या चेंडूवर १० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध नऊ धावा केल्या होत्या. नेपाळने २०१९ मध्ये भूतानविरुद्ध ९ धावा केल्या होत्या.

झिम्बाब्वेविरुद्धच्या भारतीय डावात सिकंदर रझाने पहिल्या चेंडूवर नो-बॉल टाकला, ज्यावर यशस्वी जैस्वालने षटकार ठोकला. यानंतर यशस्वीने फ्री हिटवरही षटकार ठोकला. मात्र, यशस्वी पाचव्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. याआधी यशस्वीने चौथ्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले होते. त्याने चौथ्या सामन्यात ५३ चेंडूत ९३ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि दोन षटकार मारले होते.

हेही वाचा – कॅन्सरशी लढा देणाऱ्या अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयतर्फे मदत जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील डावातील पहिल्या चेंडूवर केलेल्या सर्वाधिक धावा –

१३ – भारत विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४
१० – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, २०२२
९ – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, २०२३
९ – नेपाळ वि भूतान, २०१९
८ – केनिया वि युगांडा, २०१९