scorecardresearch

IPL History: ‘या’ ५ खेळाडूंनी पकडले सर्वात जास्त झेल; लिस्टमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश

IPL इतिहासात सर्वात जास्त झेल पकडणाऱ्या लिस्टमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Most Catches In IPL History
या पाच खेळाडूंनी IPL इतिहासात पकडले सर्वात जास्त झेल. (Image-Indian Express)

Most Catches Taken In IPL : आयपीएलचा १६ वा सीजन उद्या ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. ‘कॅचेस विन्स मॅचेस’, असं सूत्र क्रिकेटच्या मैदानाचं असतं आणि याच सूत्राचा अवलंब करून काही दिग्गज खेळाडूंनी जबरदस्त झेल पकडून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंबाबत सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल घेऊन इतिहास रचला आहे.

मिस्टर आयपीएलच्या नावाने लोकप्रिय असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून सुरेश रैनाला ओळखलं जातं. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त १०९ झेल पकडले आहेत. वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड भेदक गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी लोकप्रिय आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डने ९६ झेल पकडले आहेत.

नक्की वाचा – भारताच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने IPL मध्ये कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला; IPL इतिहासातील एकमेव क्रिकेटर

रोहित शर्माने नेतृत्वाची धुरा हातात घेत मुंबई इंडियन्सला ५ वेळा जेतेपदाचं किताब जिंकून दिलं आहे. रोहितच्या फलंदाजीचा क्रिकेटच्या मैदानात बोलबाला आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ९१ झेल पकडले आहेत. एबी डिविलियर्सला जगातील अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जातं. त्याने आयपीएलमध्ये ९० झेल पकडले आहेत. विराट कोहली आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आयपीएल इतिहासात ८५ झेल पकडले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:03 IST

संबंधित बातम्या