News Flash

हसत खेळत कसरत : खांद्याच्या स्नायूचे बळकटीकरण

खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूच्या मजबुतीसाठी व्यायाम

खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूच्या मजबुतीसाठी व्यायाम

खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. खांद्याच्या पुढील बाजूस असलेल्या स्नायूचा व्यायाम अधिक केला जातो. त्यामुळे खांद्याचा पुढील बाजूस असलेला स्नायू अधिक मजबूत असतो, त्यामानाने मागील बाजूस असलेला स्नायू कमजोर असतो. त्यामुळे यावेळी आपण खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूच्या मजबुतीसाठी व्यायाम करणार आहोत.

कसे कराल?

थेराबँडचे एक टोक पायाखाली धरून ठेवा, तर दुसरे टोक एका हाताच्या बोटांभोवती गुंडाळा. सुरुवातीलाला थेराबँडला थोडा ताण द्या आणि हाताचा कोपर सरळ ठेवा आणि मागच्या बाजूस न्या. (छायाचित्र १ पाहा.)

आता हात पुढे घेऊन हाताचा कोपर काटकोनात वाकवा (छायाचित्र २ पाहा). असे करताना खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंना थोडा ताण द्या. दररोज किमान १० वेळा असे करा. काही दिवसांनी संख्या वाढवू शकता.

dr.abhijit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:16 am

Web Title: exercises to strengthen the shoulders
Next Stories
1 सेल्फीस कारण की..
2 फर्स्ट ड्राइव्ह : अ‍ॅमिओ अस्पायर
3 सॅलड सदाबहार : ऑरेंज चिकन सॅलड
Just Now!
X