News Flash

नवलाई : ‘जेटपॅक जॉयराइड’

‘मेक मोका’ या भारतीय गेमप्रकाशक कंपनीने ‘जेटपॅक जॉयराइड’ या जगप्रसिद्ध गेमची भारतीय आवृत्ती सादर केली आहे.

‘मेक मोका’ या भारतीय गेमप्रकाशक कंपनीने ‘जेटपॅक जॉयराइड’ या जगप्रसिद्ध गेमची भारतीय आवृत्ती सादर केली आहे.

‘मेक मोका’ या भारतीय गेमप्रकाशक कंपनीने ‘जेटपॅक जॉयराइड’ या जगप्रसिद्ध गेमची भारतीय आवृत्ती सादर केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हाफब्रिक स्टुडिओजची मूळ निर्मिती असलेल्या या गेममध्ये भारतीय कथा, संस्कृती आणि पात्रे समाविष्ट करून त्याचे देशीकरण करण्यात आले आहे. बॅरिकांत नावाचा अब्जाधीश-प्लेबॉय आणि बुद्धिमान तरुण शत्रूंवर मात करण्यासाठी कशी शक्कल लढवतो, हे या गेममधून अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, या गेममध्ये खलनायकाची पात्रे यूटय़ूबवर गाजत असलेल्या तन्मय भट, बिस्व कल्याण रथ आणि झाकीर हुसेन या विनोदवीरांवर बेतलेली आहेत. हा गेम लवकरच अ‍ॅपस्टोअरवर दाखल होणार आहे.

कॅननचा ‘४के’ मिररलेस कॅमेरा

कॅनन इंडियाने ‘ईओएस एम५०’ हा नवीन कॅमेरा बाजारात लाँच केला. ‘हा मिररलेस कॅमेरा’ डिजिक आठ इमेज प्रोसेसरने सुसज्ज असून त्यात फोर के मूव्ही शुटिंग क्षमता आहे. अल्ट्रा एचडी चित्रीकरणासाठी या कॅमेऱ्याचा वापर करता येतो. यामध्ये टच आणि ड्रॅग सुविधा देण्यात आली आहे. या कॅमेऱ्यातील ‘टाइम लॅप्स मुव्ही’ सेटिंगमुळे रस्ता किंवा कोणत्याही भूप्रदेशावर ‘फोर के’ रेझोल्युशनचे व्हिडीओ चित्रित करता येतात. तसेच हे व्हिडीओ थेट सोशल मीडियावर शेअर करण्याचीही यात सुविधा आहे. यात २४.१ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.    किंमत : ६१९९५ रुपये. 

विवोचा ‘वाय५३आय’

भारतीय बाजारात आकर्षक स्मार्टफोन आणणाऱ्या विवोने ‘वाय५३आय’ नावाचा नवीन स्मार्टफोन आणला असून तो क्राऊन गोल्ड आणि मॅट ब्लॅक रंगात सर्व दुकानांत उपलब्ध झाला आहे. १२.७ सेमीचा डिस्प्ले, फेस अ‍ॅक्सेस, अल्ट्रा एचडी टेक्नॉलॉजी, आठ एमपी मागील कॅमेरा, पाच एमपी फ्रंट कॅमेरा, दोन जीबी रॅम, १६ जीबी मेमरी, २५६ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवण्याची सुविधा, २५०० एमएएच क्षमतेची बॅटरी अशी या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. यातील कॅमेऱ्यात अल्ट्रा एचडी टेक्नॉलॉजी असल्याने तो ३२ मेगापिक्सेल क्षमतेएवढय़ा कॅमेऱ्यासारखे छायाचित्रण करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे.
किंमत : ७९९० रुपये.

‘जेव्हीसी’चे स्पीकर

जपानमधील कंपनी असलेल्या ‘जेव्हीसी’ने ‘हिपहॉप बुमब्लास्टर आरव्ही-वाय४०’ नावाचे नवीन स्पीकर बाजारात आणले आहेत. रचना आणि एलईडी दिवे यामुळे हा स्पीकर आकर्षक दिसतो. याची ध्वनिक्षमता ३०वॉट आरएमएस इतकी असून त्यातून ३६० अंशाचा सराऊंड स्पीकर ध्वनीचा अनुभव वृद्धिंगत करतो. हा स्पीकर ब्लूटूथ, कराओके, गिटार, पेनड्राइव्हने जोडून संगीताचा आनंद घेता येतो. याखेरीज यामध्ये एफएम रेडिओचीही सुविधा पुरवण्यात आली आहे.
किंमत : १२९९९ रुपये

अ‍ॅस्ट्रमचा वेगळा ‘कीबोर्ड’

सर्वसाधारणपणे कीबोर्डची बटणे चौकोनी आकाराची असतात. अशा कीबोर्डवर काम करणे सोयीचे असले तरी, अ‍ॅस्ट्रम या कंपनीने गोल बटणे असलेला कीबोर्ड बाजारात आणला आहे. हा कीबोर्ड ऑपरेटिंगसाठी अधिक सोयीस्कर असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये गोल आकाराच्या कीकॅप्स, उत्तम परफॉर्मन्स देणारा माऊस आणि एका नॅनो वायरलेस रिसिव्हरचा समावेश आहे. हा कीबोर्ड ब्लूटूथने संचालित करता येत असल्याने अगदी दहा मीटर अंतरावरूनही तुम्ही संगणकाला आज्ञा देऊ शकता.
किंमत : २१९९ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:31 am

Web Title: the most interesting things
Next Stories
1 गोव्याचं खाणार, त्याला ‘नोवोटेल’ देणार!
2 बंपर गार्ड जीवघेणा
3 बुद्धाचा निर्वाण मार्ग
Just Now!
X