Ambrane Dots 38 आणि Ambrane NeoBuds 33 हे दोन नवीन ट्रू वायरलेस स्टीरिओ इअरबड्स भारतात लाँच झाले आहेत. दोन्ही इअरबड्स वॉटर रेसिस्टंट असून यासाठी IPX4 प्रमाणपत्र भेटलंय. याशिवाय दोन्ही बड्सचे फिचर्स बरेच सारखे आहेत. दोन्ही इअरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.0 चा सपोर्टही आहे.
Ambrane Dots 38 आणि Ambrane NeoBuds 33 किंमत :-
Ambrane Dots 38 ची किंमत 2,499 रुपये आहे, पण ऑफरअंतर्गत केवळ 1,299 रुपयांमध्ये हे इअरबड्स खरेदी करता येतील. तर, Ambrane NeoBuds 33 ची किंमत 1,799 रुपये आहे, पण ऑफरअंतर्गत अॅमेझॉनकडून 899 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Ambrane Dots 38 हे इअरबड्स व्हाइट कलरमध्ये तर Ambrane NeoBuds 33 हे इअरबड्स ब्लॅक, इंडिगो ब्लू आणि व्हाइट अशा तीन रंगात उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुन हे इअरबड्स खरेदी करता येतील.
Ambrane Dots 38 स्पेसिफिकेशन्स :-
Ambrane Dots 38 मध्ये ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट असून दर्जेदार आवाजासाठी यात 10mm डायनॅमिक ड्रायव्हर आहे. कॉलिंगसाठी यात इन-बिल्ट माइक देखील आहे. याशिवाय म्यूझिक कंट्रोल, कॉल रिजेक्ट यासाठी वेगळे बटण आहेत. तसेच या इअरबड्समध्ये व्हॉइस असिस्टंटचा सपोर्टही मिळेल. यातील बॅटरी 4 तासांचा बॅकअप देते आणि चार्जिंग केससोबत 16 तासांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. याच्या दोन्ही बड्स्मध्ये 40mAh ची बॅटरी आणि केसमध्ये 300mAh ची बॅटरी असून चार्जिंगसाठी टाईप-सी केबलही आहे.
Ambrane NeoBuds 33 स्पेसिफिकेशन्स :-
Ambrane NeoBuds 33 मध्येही उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.0 आणि 10mm डायनॅमिक ड्रायव्हर आहे. कॉलिंगसाठी इनबिल्ट माइक आणि टच सेन्सरही आहे, याच्या मदतीने तुम्ही म्युझिक कंट्रोल करु शकतात, शिवाय व्हॉइस असिस्टंटचा पर्यायही सुरू करता येईल. याची बॅटरी 3.5 तासांचा बॅकअप देते आणि चार्जिंग केससोबत 15 तासांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. याच्या दोन्ही बड्समध्ये 35mAh बॅटरी आणि चार्जिंग केसमध्ये 300mAh बॅटरी आहे. यातही चार्जिंगसाठी टाईप-सी केबल आहे.