आयफोन उशीराने अनलॉक होत असल्याने एका ग्राहकांने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. कॅलिफोर्नियातील जे. ब्रोड्स्की या व्यक्तीने अॅपल कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तक्रारदाराने न्यायालयाकडे अशी मागणी केली आहे की या लॉकद्वारे कंपनीने घेतलेले सर्व फायदे त्याला परत केले पाहिजे आणि कंपनीला फसवणूक व गैरवर्तन कायदा अंतर्गत दंड आकारण्यात आला पाहिजे

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, विशेष सुरक्षामुळे आयफोन अनलॉक होण्यास उशीर होत असल्याची तक्रार जे. ब्रोड्स्की यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी कंपनीला कोर्टात खेचले आहे. ब्रोड्स्की यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की, द्विस्तरीय लॉक (द्विस्तरीय लॉकचा अर्थ असा आहे की आपला संकेतशब्द एखाद्याने चोरला तरीही आपणच केवळ फोन उघडू शकता.) सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्यास कंपनीने मंजूरी दिलेली नाही.  खटल्यात असा आरोप करण्यात आला आहे की, लॉक खोलण्याच्या प्रक्रियेला खुप कालावधी लागत आहे. लॉक प्रक्रियेमध्ये एक अशी देखील समस्या आहे कि सुरक्षिततेनंतर १४ दिवसांपर्यंत द्विस्तरीय सुरक्षा प्रक्रिया सक्रिय झाल्यानंतर ही काढू शकत नाही.