08 March 2021

News Flash

Infinix Smart 4 Plus : पहिल्या सेलमध्ये फक्त एका मिनिटात झाला ‘सोल्ड आउट’, कंपनीचा दावा

कमी किंमतीत दमदार फीचर्स

बजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी Infinix ने गेल्या आठवड्यात भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Smart 4 Plus लाँच केला. त्यानंतर काल(दि.28) पहिल्यांदा हा फोन विक्रीसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलमध्ये उपलब्ध होता. दुपारी 12 वाजता सेलला सुरूवात होताच अवघ्या एका मिनिटात फोन ‘आउट ऑफ स्टॉक’ झाला, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. तब्बल 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 6.82 इंच स्क्रीन असलेला हा फोन तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
अँड्रॉइड 10 आधारित XOS 6.2 वर कार्यरत असलेल्या इन्फिनिक्सच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंच एचडी+ स्क्रीन असून ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए-25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम 3 जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय DTS-HD सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यातील 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत?:-
कंपनीने 7,999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:51 pm

Web Title: infinix smart 4 plus sold out in one minute via flipkart on its first sale check price specifications and other details sas 89
Next Stories
1 तातडीने Delete करा 29 धोकादायक Apps, गुगलने प्ले स्टोअरवरुनही हटवले
2 BSNL ची खास ऑफर आता 31 ऑगस्टपर्यंत, कॉलच्या बदल्यात 50 रुपये कॅशबॅक!
3 48 MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची बॅटरी, Infinix Hot 9 Pro खरेदी करण्याची संधी
Just Now!
X