News Flash

मेंदूवर व पाठीच्या कण्यावर परिणाम करणाऱ्या ‘या’ आजाराची आहे का माहिती?

बऱ्याच वेळा लहान वाटणाऱ्या गोष्टी मोठ्या आजारांचे संकेत असतात

डॉ. प्रदीप महाजन

धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यात महिलावर्ग त्यांच्या लहानसहान आजारांकडे कायम दुर्लक्ष करतात. मात्र याच लहान वाटणाऱ्या आजाराचं कधी मोठ्या आजारात रुपांतर होईल हे सांगता येत नाही. अनेक वेळा काम करताना किंवा अचानकपणे थकवा जाणवणं किंवा चक्कर येणं या सारख्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु बऱ्याच वेळा या लहान वाटणाऱ्या गोष्टी मोठ्या आजाराचं संकेत असतात. अनेक जणांना मल्टिपल स्क्लेरॉसिस या आजाराविषयी माहिती नसेल. मेंदूवर आणि पाठीच्या कण्यांवर परिणाम करणारा हा आजार असून त्याची नेमकं लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊ.

मल्टिपल स्क्लेरॉसिस हा असा विकार आहे ज्यामुळे व्यक्तीच्या मेंदूवर आणि पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. एखादी व्यक्ती जनुकीयदृष्टया नाजूक असल्यास किंवा शरीरात जीवनसत्वांचे प्रमाण कमी असल्यास, विषाणू आणि पर्यावरणीय घटकांमुळे हा विकार जडू शकतो. या विकाराचा परिणाम मज्जातंतूंभोवती असलेल्या संरक्षक कवचावर होतो. परिणामी, मज्जासंस्था शरीराला संदेश पाठविण्याचे कार्य करू शकत नाही.
मल्टिपल स्क्लेरॉसिसची लक्षणं –
थकवा येणे
दृष्टीदोष
मुंग्या येणे अथवा बधीर होणे
उंच ठिकाणी गेल्यावर भीती वाटणे
चक्कर येणे
स्नायू अशक्त होणे आणि गोळे येणे
तोल आणि समन्वयाशी निगडीत समस्या
अस्पष्ट उच्चार
गिळताना येणाऱ्या समस्या
आकलनक्षमतेवर परिणाम
चालताना त्रास होणे
मलमूत्रविसर्जनाच्या समस्या
स्वभावातील चढउतार किंवा नैराश्य

मल्टिपल स्क्लेरॉसिस झालेल्या रुग्णावर बहुधा इम्युन-सप्रेसिव्ह औषधे आणि मोनोक्लोनल अँटिबॉडीजनी या पद्धतीने उपचार करण्यात येतो. मात्र या औषधांचा अतिरेक चांगला नाही. जर ही औषधे जास्त कालावधीसाठी वापरली तर त्याचे साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. तसंच या आजारात सेल्युलर थेरपीचादेखील वापर केला जातो. यात स्टेम सेलच्या विविध गुणधर्माचा वापर करुन मल्टिपल स्क्लेरॉसिसवर उपचार करण्यात येतात. इतकंच नाही तर ऑटोलॉगस पेशींवर आधारित थेरपीमध्ये रुग्णाच्या स्वत:च्या शरीरातील स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण करण्यात येते, ज्याने प्रतिकारक क्षमता पुनस्थापित होते. ऑटोलॉगस स्टेम सेल या न्यूरोप्रोटेक्टिव्ह असून त्यात पॅराक्राईन गुणधर्मदेखील असतात.

ऑटोलॉगस स्टेम सेलप्रमाणे स्टेमसेलमध्ये असलेल्या प्रतिकारक्षमता व्यवस्थापनाच्या गुणधर्मामुळे मल्टिपल स्क्लेरॉसिस झालेल्या रुग्णांच्या केंद्रीय चेतासंस्थेला झालेले नुकसान भरुन काढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपाय झालेल्या मज्जातंतूची पुनर्निर्मिती करण्यास मदत करतात. त्यामुळे रुग्णांला बरं होण्यास २ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. स्टेमसेल शरीरात कार्यरत करण्यासाठी विविध मार्ग आहेत, रुग्णाची परिस्थिती आणि आवश्यकता यावर हा मार्ग अवलंबून असतो. चेतासंस्थेच्या विकारामध्ये ज्या मार्गाने पेशी मेंदूपर्यंत पोहोचविता येऊ शकतात, तो मार्ग योग्य मार्ग असतो.

मल्टीपल स्क्लेरॉसिस सारख्या विकाराला रोखता येत नाही. परंतु वेळीच निदान त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकते. प्रतिबंधक उपायांमध्ये जीवनशैलीच अचूक बदल, समतोल आहाराचे सेव आणि मद्यपान,तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योगसाधना करणे जेणेकरून तणावापासून दूर राहणे शक्य होईल.

(डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिकल एक्स्पर्ट, डॉ. महाजन हॉस्पिटल)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 4:37 pm

Web Title: multiple sclerosis signs and symptoms ssj 93
Next Stories
1 कर्जदारांवरील ताण कमी करण्यासाठी सरकारकडून काय सुविधा दिल्या जातात?
2 फोनची बॅटरी लवकर संपतेय? ‘हे’ उपाय करून पाहा
3 Reliance JioMart बेवसाइट सुरू, सामानावर पाच टक्के डिस्काउंट
Just Now!
X