डॉ. प्राची हेंद्रे

दातदुखीची समस्या आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये पाहायला मिळते. मात्र, यापैकी अनेक जण हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे त्रस्त असतात. खरंतर मौखिक आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र, अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून पुढे अनेक मौखिक समस्या निर्माण होतात. यापैकीच आज हिरड्यांमधून नेमका रक्तस्त्राव का होतो हे जाणून घेऊयात.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

हिरड्यांमधून रक्स्त्राव होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी एक म्हणजे स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल, खाण्याच्या चुकीच्या सवयी व रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी. यामुळे हिरड्यामधून रक्तस्त्राव होऊ शकतो. मात्र, दात घासण्याचे योग्य तंत्र जाणून घेतल्यास आणि दर सहा महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट दिल्यास या समस्या दूर होऊ शकतात.

हिरड्यांमधील रक्तस्त्राव, पेरीओन्डोटायटीस आणि दात किडणे यासारख्या दातांच्या समस्या सामान्यत: लोकांमध्ये दिसून येतात आणि ही संख्या चिंताजनक पध्दतीने वाढत आहे. बरेच लोक दात घासण्याचे चुकीचे तंत्र वापरतात जे चुकीचे ब्रश वापरुन, खुप जोरजोरात दात घासतात किंवा अगदी हळूवारपणे दात घासतात. तर काही जण दोन्ही बाजूंनी दात घासत नाहीत किंवा खूप वेळ दात घासणे अथवा अगदी कमी कालावधीतच दात घासणे अयोग्य आहे. दाताच्या आतील पृष्ठभाग पोकळी निर्माण होणे, किड लागणे आदी समस्या उद्भवतात. म्हणून योग्य तंत्राचा अवलंब करून दात घासणे आवश्यक आहे. दात घासण्याच्या अयोग्य तंत्रासह इतर काही घटक देखील आहेत ज्यामुळे हिरड्यांची समस्या उद्भवू शकते.

१. दातांच्या समस्या घेऊन येणार्‍या रुग्णांपैकी जवळजवळ ७० टक्के रुग्णांना हिरड्यांतून रक्त येत असल्याची समस्या असते. ही समस्या दात घासण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होते.

२. ३० ते ४० वयोगटातील महिलांना गरोदरपणात तसेच हार्मोन्सची पातळी जास्त असल्यास हिरड्यांभोवती बॅक्टेरिया जमा होता. त्यामुळे हिरड्या संवेदनशील होता. व हिरड्यातून सहज रक्तस्राव होतो.

३. मधुमेह असलेल्या लोकांना मौखिक आरोग्य समस्या विकसित करण्याचा धोका असतो.

४. मुख्यतः ब्रेड आणि चीप्स यासारखे पदार्थ दातांना चिकटल्याने. त्यातील बॅक्टेरिया दातांवर हल्ला करतात आणि त्यामुळे दातांच्या समस्या उद्भवात.

निरोगी हिरडयांसाठी घ्या ‘ही’ काळजी

१. दात घासण्याच्या आणि दातांच्या स्वच्छतेबाबत योग्य तंत्राबद्दल दंतचिकित्सकांचा वेळीच सल्ला घ्या.

२. आपल्या आहारात बेरीज, किवी, सफरचंद,नासपती, बेरी, संत्री, क्रॅनबेरी आणि गाजर, पालक, ब्रोकोली आणि पालेभाज्यांचा समावेश करा.

३.आपल्या हिरड्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दर ६ महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट द्या.

( लेखिका डॉ. प्राची हेंद्रे या पुण्यातील अपोलो क्लिनिकच्या पीरियडॉन्टिस्ट एण्ड इम्प्लांटोलॉजिस्ट (गम स्पेशलिस्ट) आहेत.)