News Flash

‘क्वॉड कॅमेरा सेटअप’सह ‘पॉवरफुल’ बॅटरी, Redmi Note 9 झाला लॉन्च

'रेडमी नोट 9' सीरिजमधला चौथा हँडसेट आला...

शाओमीने अखेर आपला Redmi Note 9 हा नवीन स्मार्टफोन काल(दि.30) एका ऑनलाइन ग्लोबल इव्हेंटमध्ये लॉन्च केला. हा फोन रेडमी नोट 9 सीरिजमधला चौथा हँडसेट आहे. Redmi Note 9 Pro, Redmi Note 9 Pro Max आणि Redmi Note 9s हे हँडसेट कंपनीने यापूर्वीच लॉन्च केले आहेत. नवीन रेडमी नोट 9 फोनमध्ये कंपनीने होल-पंच डिस्प्ले दिलाय. या सीरिजमधील अन्य फोनमध्येही याच डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये होल-पंच स्क्रीन डाव्या बाजूला आहे. याशिवाय रेडमी नोट 9 मध्ये मागील बाजूला क्वॉड कॅमेरा म्हणजे चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे. अँड्रॉइड 10 वर आधारित हा फोन MIUI 11 वर कार्यरत असेल. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.53 इंचाचा फुल-एचडी+आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसर दिले असून 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत. इनबिल्ट स्टोरेजसाठीही 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन पर्याय आहेत. याशिवाय, माइक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येईल.

रेडमी नोट 9 सीरिजच्या अन्य फोनप्रमाणे यातही क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील एक 48 मेगापिक्सलचा Samsung GM1 प्रायमरी सेन्सर आहे. तर 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वाय-फाय, युएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस हे फीचर्स आहेत.

किंमत –
रेडमी नोट 9 च्या 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत $199 म्हणजे जवळपास 15,100 रुपये आहे. तर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअटची किंमत $249 म्हणजे जवळपास 18,900 रुपये आहे. हा फोन फॉरेस्ट ग्रीन, पोलार व्हाईट आणि मिडनाइट-ग्रे अशा तीन कलरच्या पर्ययांमध्ये उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मे महिन्यामध्ये रेडमी नोट 9 ची विक्री सुरू होईल. पण, भारतात या फोनची विक्री कधीपासून सुरू होईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. मात्र, देशातील लॉकडाउन उठल्यानंतर लगेच हा फोन भारतातही विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल अशी शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 10:56 am

Web Title: xiaomis global launch event redmi note 9 with quad rear cameras 5020mah battery launched know price specifications and all details sas 89
Next Stories
1 Video: १ मे १९६० ला असा साजरा झाला पहिला ‘महाराष्ट्र दिन’; रोषणाई, जल्लोष यात्रा अन् बरचं काही…
2 व्हिडिओ कॉलिंगची ‘डिमांड’ वाढली, आता रिलायन्सने आणलं JioMeet अ‍ॅप
3 भन्नाट ऑफर : ‘फ्री’मध्ये दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Just Now!
X