ज्योतिष शास्त्रानुसार, २०२२ मध्ये ‘या’ ३ राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकेल, धन-धान्यात वाढ होईल

नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा महिना शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२२ हे वर्ष काही राशींसाठी विशेष फलदायी असणार आहे. नवीन वर्षात त्यांच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी…

rashifal-2022 (1)

2022 Rashifal In Marathi: नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा महिना शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२२ हे वर्ष काही राशींसाठी विशेष फलदायी असणार आहे. नवीन वर्षात त्यांच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत. आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न चांगले राहील. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. २०२२ मधील या भाग्यवान तीन राशींबद्दल जाणून घ्या.

मेष : नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप सकारात्मक आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमचं काम वेळेवर पूर्ण होईल. जीवनाच्या विविध क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा चांगली राहील. नवीन काम सुरू करू शकाल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रवासातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अनेक पटींनी चांगली होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

वृषभ: तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळेल. हे वर्ष करिअरसाठी खूप अनुकूल असणार आहे. व्यावसायिक जीवनात खूप प्रगती होईल. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. धनसंचय करण्यात यश मिळेल. सुख-सुविधा वाढतील. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

सिंह: तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. जीवनात सकारात्मकता येईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल. जीवनात नशिबाची साथ मिळेल. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही काळ अनुकूल दिसत आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. पगारही वाढू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: According to astrology the luck of these 3 zodiac signs will shine like gold in 2022 there will be an increase in wealth and grain prp

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या