Diabetes Symptoms: मधुमेह हा सामान्य आजार बनत चालला आहे. मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेची चाचणी करणे हा सर्वात अचूक आणि सोपा मार्ग आहे. पण तुम्ही तुमच्या हाताकडे लक्ष देऊन मधुमेह देखील ओळखू शकता. जेव्हा आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा हातांचा रंग बदलू लागतो. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशन (AAD) ने हातावर दिसणाऱ्या मधुमेहाच्या या लक्षणांबद्दल माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेहाचे निदान हाताने कसे करावे?

रक्तात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यास मधुमेह होतो. AAD नुसार, हातावर वेगळ्या प्रकारची खूण, बदलता रंग दिसला तर ते शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते. मधुमेहाची ही लक्षणे बारकाईने ओळखून, आपण मधुमेहावरील उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया मधुमेहामुळे हातावर कोणती चिन्हे दिसतात?

( हे ही वाचा: शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होऊ लागल्या वेदना, तर समजून जा कोलेस्ट्रॉल वाढत आहे, जाणून घ्या High Cholesterol ची लक्षणे)

मधुमेहाचे संकेत: हातावर पिवळे, लाल किंवा तपकिरी खुणा

जसजसा मधुमेह वाढत जातो तसतसे हातावर पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसू शकतात. मधुमेहाची ही चिन्हे लहान फोडांच्या स्वरूपात सुरू होतात. जे कालांतराने मोठे ठिपके बनतात. या स्थितीला नेक्रोबायोसिस लिपोइडिका म्हणतात.

त्वचेचा रंग गडद होणे

मधुमेहाचे हे लक्षण बहुतेकदा कोपरा आणि काखेजवळ दिसून येते. यामध्ये त्वचेचा रंग जांभळ्या रंगासारखा गडद होऊ लागतो. त्वचेच्या रंगात हा बदल म्हणजे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढत आहे. हे प्री-मधुमेहाचे लक्षण आहे, ज्याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स(Acanthosis Nigricans) असेही म्हणतात.

( हे ही वाचा: सारा अली खान आणि विराट कोहली का पितात Alkaline Water? जाणून घ्या काय आहेत या काळ्या पाण्याचे फायदे)

जाड आणि कठोर त्वचा

जर तुमच्या हाताच्या बोटांभोवतीची त्वचा जाड आणि कडक होत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. ज्याचे नाव डिजिटल स्क्लेरोसिस(Digital Sclerosis) आहे. परंतु हे चिन्ह तळहाताच्या मागील बाजूस दिसते, ज्यामुळे बोटे वाकणे देखील कठीण होते. मधुमेहामुळे पुढच्या हाताची आणि हाताच्या वरची त्वचाही जाड आणि कडक होऊ शकते.

हातावर फोड येणे

मधुमेहामुळे हातावर फोड येणे हे दुर्मिळ लक्षण आहे. पण काही वेळा मधुमेही रुग्णांच्या हातावर मोठे फोड येतात. ते दोन किंवा अधिक असू शकते. पण या अल्सरमुळे वेदना होत नाहीत.

( हे ही वाचा: भारतात करोनाची चौथी लाट? प्रचंड वेगाने वाढतोय Omicron XBB चा धोका, ‘ही’ गोष्ट तुम्हाला वाचवू शकते)

संसर्ग

हातावर पुन्हा-पुन्हा त्वचेचा संसर्ग होत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. कारण, हे तुमचं डायबिटीजचं होण्याचं लक्षण असू शकतं. या संसर्गामुळे त्वचेवर जळजळ, सूज आणि वेदना होतात. त्याच वेळी, लहान मुरुमांसह खाज देखील येऊ शकते

हातावर मधुमेहाची इतर चिन्हे

  • जखमा आणि फोड बरे न होणे
  • मोठे ठिपके येणे
  • लहान पिवळसर पुरळ येणे
  • हातावर लाल-दाणेदार खुणा
  • त्वचेवर जास्त कोरडेपणा
  • पापण्यांभोवती पिवळे ठिपके
  • त्वचेचे टॅग (चामखीळ) येणे.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes symptoms on hands which reveals increasing blood sugar in body know its 12 signs gps
First published on: 04-11-2022 at 12:25 IST