Father’s Day 2025 Gift Ideas For Dad : अरे माझ्यासाठी कशाला केक आणला, मला गिफ्ट वगैरे काही आवडत नाही, मला नवीन कपड्यांची काय गरज आदी अनेक गोष्टी अगदी हक्कांनी बोलणाऱ्या बाबांच्या मनात कुठेतरी या सगळ्या गोष्टी अगदी आवडीने घेण्याची इच्छा असतेच. पण, कुठे तरी भेटवस्तूंपेक्षा त्यांच्या मनात मुलांमध्ये आणि त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दल खंत असते. त्यामुळे वडिलांना मुलांकडून ज्या भेटवस्तूंची अपेक्षा असते, त्याच गोष्टी तुम्हीही त्यांना दिल्या पाहिजेत. येत्या रविवारी १५ जून २०२५ रोजी फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे.

तर तुम्हीही या फादर्स डेला तुमच्या वडिलांना भेट द्या. भेटवस्तू मिळाल्यानंतर प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी फादर्स डे असेल आणि त्यांना तुमचा अभिमानही वाटेल. मार्केटमधून महागड्या भेटवस्तू खरेदी करता येतात, पण काही भेटवस्तू अशा असतात; ज्या खरेदी करता येत नाहीत. पण, त्या जर तुम्ही बाबांना दिल्या तर त्या मनाला स्पर्श करून जातील एवढं नक्की. यावेळी फादर्स डेच्या दिवशी तुमच्या वडिलांना ही भेट द्या, कारण प्रत्येक वडील आपल्या मुलांकडून याच गोष्टीची अपेक्षा करतात.

दररोज तुमच्या वडिलांबरोबर थोडा वेळ घालवा (Spending Time With Your Dad)

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर थोडा वेळ घालवा. त्यांचं एखादं आवडतं गाणं किंवा त्यांच्याबरोबर स्वयंपाक, वाचन, बागकाम इत्यादी गोष्टी करा. यामुळे तुमच्या वडिलांना तुमचा सहवास मिळेल आणि त्यांना एकटेपणाचा त्रास होणार नाही.

आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी वडिलांशी चर्चा करा (Talk To Father Before Making Important Decisions )

तुमच्या वडिलांचा काळ वेगळा होता आणि तुमचा काळही वेगळा आहे. पण, तरीही ते तुमचे वडील आहेत, त्यामुळे त्यांना निर्णय किंवा एखादी गोष्ट ठरवण्याच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. म्हणून जेव्हाही तुम्ही आयुष्यात कोणताही मोठा निर्णय घ्याल, तेव्हा तुमच्या वडिलांशी चर्चा करा. यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व कळेल.

वडिलांच्या भूतकाळातील गोष्टी ऐका (Talk To Father And Listen Their old Time stories )

कधीकधी तुमच्या मोकळ्या वेळेत, तुमच्या बाबांबरोबर बसा आणि त्यांच्या भूतकाळातील गोष्टी ऐका. त्यांच्याशी त्यांचे बालपण, मित्र, नोकरी इत्यादींबद्दल बोला. अशा प्रकारच्या संभाषणामुळे तुमच्या वडिलांना खूप बरे वाटेल आणि तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आयुष्याबद्दल खूप काही कळेल आणि बरेच काही शिकायलासुद्धा मिळेल.

त्यांना मदत करा (Help Your Father)

तुमचे वडील तुमच्यापासून दूर राहत असूदेत किंवा तुमच्याबरोबर. त्यांच्या आयुष्यात असे दिवस येतील, जेव्हा त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता असेल; त्यामुळे त्यांची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या वडिलांच्या कठोर परिश्रमामुळे, त्यांच्या प्रेमामुळे आणि चांगल्या संगोपनामुळे आहात. त्यांच्या प्रेमाचा नेहमीच आदर करा आणि त्यांनी मागण्यापूर्वी त्यांच्या गरजा समजून घेण्याचा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

मतभेद उद्भवल्यास ते सोडवा (Solve Your Fight With Problems)

घरातल्या प्रत्येक मुद्द्यावर तुमचे आणि तुमच्या वडिलांचे विचार जुळतीलच असे नाही. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वडिलांच्या बोलण्याचा राग मनात ठेवला पाहिजे. त्यांच्याशी शांतपणे बोलून तुमचे प्रश्न सोडवा. त्यांना दुखावणारे शब्द बोलूसुद्धा नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या गोष्टी तुम्ही बाबांना देण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या आणि त्यांच्या जीवनात आनंद येईल. याव्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही घ्यायचं असेल तर तुम्ही पावसाळी चप्पल, एखादी छान छत्री, टाय, घड्याळ, पर्स, स्पेक्स, कॉम्प्युटर चष्मा, ऑफिससाठी बॅग, टोपी आदी अनेक गोष्टी बाबांसाठी घेऊ शकता आणि त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.