How Much Should You Drink Water Every Day : पाण्याला जीवन म्हंटले जाते. कारण – पाणी त्वचेसाठी, पोट साफ होण्यासाठी अगदी हायड्रेट राहण्यात मदत करते. शरीरात होणाऱ्या असंख्य प्रक्रियांना पाण्याद्वारे आधार मिळतो. ज्यामुळे आपण निरोगी आणि सक्रिय राहतो. पण, तुम्ही दररोज किती पाणी प्यायलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. कारण – प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा मोठ्या प्रमाणात बदलत असतात.
तर पिण्याच्या पाण्याचे फायदे, दिवसाला तीन लिटर पाणी पिण्याचे परिणाम आणि उत्तम आरोग्यासाठी योग्य संतुलन कसे साधायचे याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.
तुम्ही रोज ३ लिटर पाणी प्यायल्यास काय होईल?
जेव्हा तुम्ही जास्त हालचाल किंवा उष्ण हवामानात असता तेव्हा दररोज तीन लिटर पाण्याचे सेवन केल्याने हायड्रेशन वाढू शकते. यामुळे टेम्परेचर रेग्युलेशन, सांधे आणि पोषक तत्वांच्या ट्रान्सपोर्टेशन यासारख्या शारीरिक कार्यांना फायदा होतो. तर याबद्दल नोएडातील यथार्थ हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजीचे प्रमुख डॉक्टर उपेंद्र सिंग यांचे मत आहे की, हायड्रेशन पातळी मूत्रपिंडाच्या कार्यक्षम कार्याला प्रोत्साहन देते, विषारी पदार्थ काढून टाकते, मूत्रपिंडातील मुतखड्यांचा धोका कमी करते आणि थकवा दूर करून शारीरिक सहनशक्तीला आधार देते.
पण, जास्त पाणी पिल्याने कधीकधी हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवू शकते, जिथे रक्तातील सोडियमची पातळीत वाढ होते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील अंतर्गत औषधातील वरिष्ठ सल्लागार डॉक्टर राकेश गुप्ता म्हणतात की, मळमळ, डोकेदुखी, गोंधळ आणि गंभीर प्रकरणांमध्ये झटके किंवा कोमा आदी लक्षणे जास्त पाणी प्यायल्यामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे , तीन लिटर पाणी काहींना फायदेशीर ठरू शकते. पण, वैयक्तिक गरजा, जीवनशैली आणि हवामानानुसार पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
कोणी किती पाणी प्यावे?
डॉक्टर गुप्ता आणि डॉक्टर सिंग यांच्या महिन्यानुसार पुरुषांसाठी सुमारे ३.७ लिटर आणि महिलांसाठी २.७ लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जात असली तरीही शरीराच्या वजन, हवामान आणि ॲक्टिव्हिटीजनुसार पाणी पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. म्हणूनच प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी अंदाजे ३०-३५ मिलीलीटर पाणी पिणे योग्य आहे. उदाहरणार्थ – ७० किलो वजनाच्या व्यक्तीला दररोज अंदाजे २.१ ते २.५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. कारण – अशी मंडळी जास्त वेळ व्यायाम करतात किंवा उष्ण हवामानात राहतात त्यांना अतिरिक्त हायड्रेशनची आवश्यकता असू शकते.
जास्त पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते का?
डॉक्टर गुप्ता आणि डॉक्टर सिंग म्हणाले की, हो जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. जास्त पाणी प्यायल्याने हायपोनेट्रेमिया होऊ शकतो, जिथे रक्तातील सोडियमची पातळी पातळ होते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात. काही लोकांनी हायड्रेशनची विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांची यादी पुढीलप्रमाणे…
१. मूत्रपिंड किंवा हृदयाच्या समस्या असणाऱ्या व्यक्ती
जास्त प्रमाणात पायाचे सेवन केल्याने द्रवपदार्थ साठवण्याची समस्या वाढू शकते; ज्यामुळे त्यांच्या शरीरातून जास्त पाणी बाहेर काढणे कठीण जाते.
२. खेळाडू
दीर्घकाळ सहनशक्तीच्या लागणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असलेल्यांनी पाण्याचे इलेक्ट्रोलाइट्सशी संतुलन राखले पाहिजे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यावर देखील परिणाम होतो.
३. वृद्ध मंडळी
अनेकदा तहान लागत नाही ही लक्षणे जाणवतात आणि नकळत पाण्याचे जास्त सेवन केले जाते.
पाणी पिणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असले तरीही जास्त पाणी पिणे अजिबात चांगले नाही. व्यायामादरम्यान तुमच्या शरीराचे ऐकणे, इलेक्ट्रोलाइट्ससह हायड्रेशन संतुलित करणे आणि तुमच्या विशिष्ट आरोग्य स्थितीबद्दल जागरूक राहणे हे हायड्रेशन राखण्यासाठी आवश्यक पावले आहेत ; जी आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजेत..