Side Effects Of Kiwi: किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम किडनी करते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आणि शरीरातील आम्ल आणि क्षार यांचे संतुलन राखणे हे किडनीचे महत्वाचं काम आहे. किडनी रक्त शुद्ध करते आणि शरीरातील घाण लघवीद्वारे बाहेर काढते. किडनी अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन, प्रोस्टॅग्लॅंडिन यांसारखे अनेक हार्मोन्स तयार करते. जेव्हा शरीराचा हा अत्यावश्यक भाग खराब होतो तेव्हा शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात

किडनी निकामी झाल्यामुळे भूक न लागणे, पायाच्या घोट्याला सूज येणे, त्वचेत जास्त कोरडेपणा येतो. अशक्तपणा, थकवा, डोळ्याभोवती सूज आणि वारंवार लघवी होणे ही किडनी निकामी होण्याची लक्षणे आहेत. नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गुरुग्रामचे वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संदीप सिंग सचदेवा यांनी सांगितले की, किडनीच्या आजाराची लक्षणे वेळीच ओळखली गेली, तर या आजाराचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. काही पदार्थांच्या सेवनाने या आजाराचा धोका वाढू शकतो. किवी हे असेच एक फळ आहे ज्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. पौष्टिकतेने समृद्ध असलेले हे फळ अनेक रोगांवर उपचार करते, परंतु ज्या लोकांना किडनीचा त्रास आहे, त्यांच्या आरोग्यावर त्याचा विषासारखा परिणाम होतो. किडनीच्या आजारात किवीच्या सेवनाचा विषाप्रमाणे कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.

( हे ही वाचा: मुंबईकरांच्या चिंतेत भर! शहरात अचानक पसरली गोवरची साथ, तीन बालकांचा मृत्यू, आजाराची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या)

किडनी रुग्णांसाठी किवी हे फळ विष कसे ठरते?

किवीचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अगणित फायदे होतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु काही आजारांमध्ये किवीचे सेवन केल्याने नुकसानही होते हे तुम्हाला माहीत आहे का. ज्या लोकांची किडनी खराब आहे किंवा किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी या फळाचे सेवन करू नये. या फळामध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे किडनीच्या आजाराची समस्या वाढू शकते. किडनीच्या आजारामध्ये पोटॅशियमचा वापर करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅसिड खूप जास्त असते, ज्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. किवीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे जुलाब, पोटदुखी आणि उलट्या होण्याच्या तक्रारी येऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किवी हे असेच एक फळ आहे जे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. त्यात दाहक-विरोधी, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, नियासिन, रिबोफ्लेविन, बीटा कॅरोटीन यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त किवी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि शरीर निरोगी ठेवते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की व्हिटॅमिन सी ची रोजची गरज पूर्ण करण्यासाठी एक किवीचे सेवन पुरेसे आहे.