When vs what you eat: रोज आपण धावपळ करतो, घरातील कोणतीही काम करतो; त्यासाठी जी एनर्जी लागते ती अन्नातून मिळत असते. मात्र, किती लोकं रोजच्या जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळतात. वेळच्या वेळी जेवण करतात. फार कमी लोकं आहेत जे जेवणाच्या वेळा पाळतात. जर तुमची खाण्याची वेळ योग्य असेल तर तुम्ही स्वतःला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता, असं आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारून तुम्ही स्वतःला अनेक धोकादायक आजारांपासून वाचवू शकता. जर आपण आपल्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तर आपण लठ्ठपणा, मधुमेह आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून तीनही वेळा जेवणाच्या वेळेकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. चला तर मग नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया. आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, प्राची मंधोलिया आणि मल्टीफिटचे पोषणतज्ज्ञ, रोहित वाघमारे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

जेवणाची वेळ चयापचय प्रक्रियांवर कसा परिणाम करते

आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा सांगतात की, जेवणाच्या वेळेचा शरीरातील चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. “आपले शरीर सूर्याप्रमाणेच कार्य करते. सकाळी शरीरात बीएमआर (बेसल मेटाबॉलिक रेट) जास्त असतो आणि जसजसा सूर्य मावळायला लागतो, तसतसा शरीराचा बीएमआर कमी होतो. रात्रीच्या वेळी आम्ही आहारतज्ज्ञ म्हणून रुग्णांना लवकर किंवा ९ च्या आधी जेवायला सांगतो किंवा हलके खाण्यास सांगतो, कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या अवयवांनाही विश्रांती मिळते आणि आपले पचन मंदावते. रात्रीच्या वेळी जास्त आहार घेतल्यानं आपल्या शरीराची ऊर्जा अन्नाच्या पचनाकडे वळवली जाते आणि त्यामुळे योग्य झोप मिळू शकत नाही. परिणामी, अन्न पूर्णपणे पचत नाही.

प्राची मंधोलिया सांगतात की, तुम्ही खात असलेल्या अन्नाची गुणवत्ता पचन प्रक्रियेसाठी योग्य आहे का तपासणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी बाहेरचे फास्ट फूड पचण्यासाठी जड जाते, याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

मल्टीफिटचे पोषणतज्ज्ञ, रोहित वाघमारे प्राची मंधोलिया सांगतात की, अनियमित वेळी किंवा रात्री उशिरा खाण्याचे परिणाम एकूण आरोग्यावर होतात, यामुळे तुम्हाला चांगली झोपही लागणार नाही. तसेच हार्मोनल असंतुलन, वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतील.

आहारतज्ज्ञ अनुश्री शर्मा सांगतात की, जे नियमितपणे जिममध्ये व्यायाम करतात, त्यांच्यासाठी जेवणाची वेळ खूप महत्त्वाची असते. “उदाहरणार्थ, व्यायाम करण्यापूर्वी शेवटचे जेवण जिममध्ये जाण्यापूर्वी किमान एक तास असावे. व्यायामानंतरचे जेवण हे पोषक तत्वांचे शोषण वाढवण्यासाठी साधे पोषक असले पाहिजे.”

नाश्ता कधी करावा?

तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही योग्य वेळी नाश्ता केला पाहिजे. यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी ७ ते ८ आहे. न्याहारी सकाळी १० नंतर कधीही करू नये. हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी खावे.

हेही वाचा >> हृदयविकाराचा झटका ओळखून स्मार्ट वॉच तुमचा जीव वाचवू शकतो का? वाचा संशोधनातून समोर आलेली माहिती…

दुपारच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारच्या जेवणाचीही वेळ असते, यानंतर दुपारचे जेवण केल्यास शारीरिक समस्या वाढू शकतात. दुपारी १२.३० ते २ पर्यंत जेवणाची उत्तम वेळ आहे. यामध्ये न्याहारी आणि दुपारच्या जेवणातही चांगले अंतर आहे. दुपारचे जेवण दुपारी ४ नंतर कधीही घेऊ नये, यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे हे लक्षात ठेवा.