स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. मनोरंजन, संवाद आणि माहिती मिळवण्यासह अन्य काही कामांसाठी स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच आता कुठेही येण्या-जाण्याऐवजी स्मार्टफोनद्वारे बरीच कामे सहज केली जात आहे. स्मार्टफोनने अनेक गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. आता फोन वापरण्याबरोबरच त्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण अशा चुका करतो, ज्या फोन वापरताना देखील लक्षात येत नाही आणि ते तुमच्या स्मार्टफोनसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ज्या गोष्टीने तुमचा फोन खराब होणार नाही किंवा तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे.

स्क्रीनचं ऑन टाइम कमी करा.

फोनची स्क्रीन बराच वेळ अॅक्टिव्ह ठेवल्याने बॅटरी लवकर संपते. अशातच जेव्हा तुम्ही फोनवर काही काम करत नसाल तेव्हा ब्राइटनेस देखील कमी करा. याने फोनच्या बॅटरीची बचत होते.

ऑटो-ब्राइटनेस मोड वापरा

प्रत्येक स्मार्टफोन मध्ये ऑटो-ब्राइटनेस मोड असतो. मोबाइल बॅटरीची लाइफ वाढवण्यासाठी तुम्ही फोनमधील ऑटो-ब्राइटनेस मोड वापरू शकतात. जे प्रकाशानुसार स्क्रीन वरील ब्राइटनेस एडजेस्ट करते. यामुळे फोनच्या बॅटरीचा वापर कमी होतो.

फोन जास्त चार्ज करू नका

अनेकजण त्यांच्या मोबाईलची बॅटरी अधिक काळ टिकून राहण्यासाठी तसेच बॅटरी लाइफ अधिक काळ मिळवण्यासाठी लोक बर्‍याचदा फोन फूल चार्ज करतात. परंतु असे केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर खराबही होऊ शकते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच मोबाइल चार्ज करा आणि चार्जिंग पूर्ण झाल्यावर चार्जर काढा. अशाने फोनची बॅटरी लाइफ चांगली राहते.

स्मार्टफोनचे वापर झाल्यावर लगेच करा हे काम

वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये वापर करून झाल्यावर किंवा बंद करताना हे फीचर्स बंद केले पाहिजेत. कारण बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या या फिचर्समुळे फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे तुम्ही योग्य स्तरावर हे फीचर्स बंद केल्याने फोनच्या प्रोसेसरची गती सुधारते.

व्हायब्रेशन मोडचा वापर कमी करा

तुम्ही मीटिंग मध्ये किंवा महत्वाच्या कामात असल्यावर तुमचा फोन तुम्ही व्हायब्रेशन मोडवर ठेवता आणि विसरून जातात. तुम्ही जर तुमचा फोन सतत व्हायब्रेशन मोडवर ठेवलात तर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपतेच. त्याचबरोबर बॅटरी लाइफ देखील कमी होते. त्यामुळे शक्यतोवर गरज भासल्यास तुम्ही तुमचा फोन हा व्हायब्रेशन मोडवर ठेवा.