टॅरिफ दरवाढीचा फटका बसलेल्या आपल्या ग्राहकांना थोडा दिलासा देण्यासाठी रिलायंस जिओने नवीन ऑफर आणली आहे. जिओने 2020 Happy New Year ऑफर आणली असून या ऑफरअंतर्गत वर्षभरासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 1.5 जीबीचा 4G डेटा, 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 2020 रुपये इतकी या प्लॅनची किंमत आहे. जाणून घेऊया या ऑफरमध्ये काय सुविधा मिळणार आहेत.

रिलायंस जिओ 2020 Happy New Year ऑफर?
2020 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12000 FUP मिनिट, दररोज 1.5जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. 365 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये एकूण 547.5 GB डेटा मिळेल. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत असेल.

कधीपासून सुरूवात?
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून 24 डिसेंबरपासून ग्राहकांना याचे फायदे मिळू शकतील.

कोणासाठी आहे ऑफर?
हा प्लॅन स्मार्टफोन आणि जिओफो दोन्ही युजर्ससाठी आहे. स्मार्टफोन युजर्सना 2020 रुपयांमध्ये एक वर्षासाठी ‘अनलिमिटेड’ सर्विसची सुविधा मिळेल. याशिवाय जे युजर्स जिओफोनचा वापर करु इच्छित असतील अशांसाठी 2020 रुपयांमध्ये एक वर्षापर्यंत ‘अनलिमिटेड’ सर्विस आणि जिओ फोन मोफत मिळेल.

आणखी वाचा – 365 दिवस वैधता; एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियामध्ये कोणाचा प्लॅन आहे ‘बेस्ट’?

काय आहे फायदा ?
यापूर्वी जिओकडे एक वर्षाची वैधता असलेला प्लॅन 2199 रुपयांमध्ये होता. पण आता नव्या ऑफरनुसार 2020 रुपयांमध्येच आधीएवढ्याच सेवा मिळणार आहेत.