Open Mouth Sleeping Habits: आपल्यापैकी अनेकांना झोपताना तोंड उघडं ठेवून झोपायची सवय असते. काही जण सर्दी झाली असेल तर अशाप्रकारे तोंड उघडून झोपतात पण याची हळूहळू सवय लागल्याने आपण तोंडावाटेच श्वास घ्यायला लागतो. हेल्थलाईनच्या माहितीनुसार ही सवय अनेक आजरांसाठी कारणीभूत ठरू शकते तसेच तुमच्या शरीरातील बिघाडांचे संकेत सुद्धा असू शकते. तोंड उघडून झोपल्याने नेमके काय नुकसान होय शकते? ही सवय शरीरातील कोणत्या आजाराचे संकेत आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात..

तोंड उघडून झोपणे ‘या’ आजारांचे लक्षण?

अनेकदा तोंड उघडून झोपणे हे स्लीप एपनियाचे लक्षण असते. हा एक असा आजार आहे ज्यात आपण स्तब्ध झोपू शकत नाही. यामध्ये पेशंटचा श्वास पुन्हा पुन्हा थांबल्यामुळे तो एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळत राहतो. श्वास गुदमरल्यामुळे घाबरून उठून बसतो. श्वास थांबला असा कदाचित भासही होऊ शकतो ही प्रक्रिया किंवा त्रास काही सेकंदाचा असतो पण यामुळे भीती वाटू शकते.

आपण चुकीच्या पद्धतीने झोपल्यास नाकावाटे नीट श्वास घेता न येणे. अनेकदा रक्त प्रवाह नाकाच्या भागात अडकून राहिल्याने, नाकाला सूज व कडकपणा येऊ शकतो. यामुळे श्वास घेता येत नाही व आपण तोंडावाटे श्वास घेऊ लागतो.

थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी खोकला वरचे वर होत असतो यामुळे सुद्धा नाक कडक होऊन श्वसनात अढथळा येऊ शकतो. हे सायनसचे लक्षण असू शकते.

बहुतांशवेळा तोंड उघडे ठेवून झोपणे हे दम्याचे लक्षण असू शकते. दम्याच्या रुग्णांना फुफ्फुसांना सूज येऊ शकते यामुळे श्वास घ्यायला अडचण येते. यामुळेच अनेकांना घोरण्याची सुद्धा सवय लागते. शरीरात रक्त प्रवाह सुरळीत नसल्यास सुद्धा नाकाची कार्यक्षमता कमी होऊन तोंडावाटे श्वास घेण्याचे सवय लागू शकते.

तोंड उघडून झोपणे हे ऍलर्जीचे सुद्धा लक्षण असू शकते. शरीराच्या अंतर्गत अवयवांना बॅक्टेरियाच्या माऱ्याने ऍलर्जी झाल्यास ऑक्सिजनची अधिक गरज असते. अशावेळी श्वसन प्रक्रिया वेगाने होते. यासाठी तोंडावाटे श्वास घेण्याचे संकेत मेंदूकडून मिळू शकतात.

जर आपण तणावात असाल तर रात्रीच्या वेळी रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. अशावेळी श्वास घेण्याचा वेग वाढून नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतला जाऊ शकतो.

हे ही वाचा<< डायबिटीज असल्यास मसूर डाळ खावी का? वजनासह किडनीवर काय प्रभाव पडतो? वाचा सविस्तर

तोंड उघडून झोपण्याची सवय कशी घालवावी?

  • तुम्हाला दिवसभरात जागे असताना स्वतः ठरवून नाकाने श्वास घ्या ज्यामुळे सवय बदलण्यास मदत होईल.
  • काहीवेळ डोक्याखाली उशी घेऊन पाठीवर झोपा यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होऊ शकते. फार उंच उशी घेऊ नका अन्यथा मानदुखी होऊ शकते.
  • घरात धूळ जमू देऊ नका. एसीमध्ये एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा.
  • तणाव दूर करण्यासाठी तर योगा किंवा ध्यानसाधना करा

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)