केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काहीजण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण तरीही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासुन मजबुत करणे गरजेचे असते. तर काहीजण पातळ केसांच्या समस्येने त्रस्त असतात.

बऱ्याच जणांना लहानपणापासून केस पातळ असण्याची समस्या असते. पातळ केसांची अनेक कारणे असू शकतात. धूळ, माती, प्रदूषण यांसारख्या कारणाबरोबर हार्मोनल बदल आणि जीवनशैलीचाही केसांवर परिणाम होतो. पातळ केस असल्यास कोणतीही हेअर स्टाईल करताना अडचण येते. जर पातळ केसांमधून टाळू दिसू लागला, तर टक्कल पडेल का अशी भीती वाटते. यावर उपाय म्हणजे पातळ केसांची योग्यरित्या काळजी घेणे यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या जाणून घ्या.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

Navratri Diet Tips : मधूमेहाच्या रुग्णांनी नवरात्रीच्या उपवासामध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

हीटिंग टूल्सचा वापर
जर तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्ही त्यांना स्टाईल करण्यासाठी दररोज हीटिंग टूल्स वापरू नका. हीटिंग टूल्समुळे तुमचे केस जास्त कोरडे होतील, तसेच यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

स्ट्रेट केस
पातळ केस असलेल्या महिलांनी केस स्ट्रेट करणे देखील टाळावे. कारण स्ट्रेट केस जास्त पातळ दिसतात.

जेलयुक्त प्रोडक्ट टाळा
पातळ केसांवर जेलयुक्त स्प्रे वापरणे टाळा. यामुळे केस अधिक पातळ दिसु शकतात.

कंडिशनर लावणे टाळा
केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरऐवजी केस तसेच राहूद्या. जर तुम्ही केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरत असाल तर तुमचे केस आणखी पातळ दिसतील. शॅम्पू केल्यानंतर केस मोकळे सोडू शकता, त्यामुळे डोक्यावरील केस अधिक दाट आणि सुंदर दिसतात.

Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक

योग्य प्रोडक्ट निवडा
जास्त केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणे टाळावे. केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे केस गळू शकतात. तुमच्या केसांसाठी योग्य असणारी उत्पादनेच निवडा. केस तेलकट किंवा कोरडे असल्यास त्या प्रकारानुसार प्रोडक्ट खरेदी करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)