How hugging is good for health: मिठीशिवाय प्रेम व्यक्त करता येत नाही. तुमच्या खास व्यक्तीसोबत तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हग डे हा सर्वांत सुंदर असा दिवस आहे. हग डेला आयुष्यातील खास व्यक्तींना प्रेमाची व मायेची मिठी मारली जाते. या दिवशी आपण एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम करतो, त्याच्याविषयी आपल्याला किती आदर आहे, त्याचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे घट्ट मिठी मारून दाखवण्याची संधी असते. मिठी मारणे ही फक्त एक भावना व्यक्त करण्याची पद्धत नसून, याचे महत्त्व शारीरिक स्पर्शाच्या पलीकडे आहे.

“मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन उत्सर्जित होतो.” या हार्मोनला इंग्रजीमध्ये ‘लव्ह हार्मोन’, असेसुद्धा म्हटले जाते. हा हार्मोन भावनिकदृष्ट्या आपल्याला निरोगी ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतो. चला तर मग जाणून घेऊयात, तुम्ही रोज एखाद्याला मिठी मारल्यास शरिरावर काय परिणाम होतो.

तुम्ही तणाव कमी करता

सोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारता तेव्हा मज्जासंस्थांना आराम मिळतो. हे मेंदूला तणाव कमी करण्यासाठी सिग्नल पाठवते. तुमच्या त्वचेला आणि शरीराला एक उत्तेजना जाणवू लागते जी नंतर मज्जासंस्थांमधून शरीराच्या उर्वरित भागात जाते, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. जेव्हा तुम्ही तणाव कमी करता आणि तुमची चिंता कमी करता तेव्हा तुम्हाला चांगली झोप येते. एक साधी मिठी काय करू शकते याची कल्पना करा. मस्त झोपेसाठी, झोपायच्या आधी फक्त १० मिनिटे तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारल्यानं झोपंही छान होते.

आनंदी हार्मोन्स

आनंदी आणि प्रेमाचा स्पर्श सेरोटोनिनचे उत्पादन वाढवू शकतो. ज्याला लव्ह हार्मोन म्हणून ओळखले जाते. सायकोलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित 2017 च्या अभ्यासानुसार, ऑक्सिटोसिनची उच्च पातळी जोडीदाराची कृतज्ञता आणि प्रेम वाढवू शकते.मिठीचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शर्मा यांच्या मते, २० सेकंदांपेक्षा जास्त काळ मिठी मारत असाल, तर ऑक्सिटोसिन हार्मोन उत्सर्जित होतो आणि त्यामुळे भावनिक आरोग्य सुधारते. जास्त वेळ टिकणारी मिठी अधिक विश्रांती देणारी असते आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीबरोबरचे खास कनेक्शन दिसून येते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणे

जेव्हा तुमची मज्जासंस्था आरामशीर स्थितीत असते, जेव्हा तुमची हृदय गती सामान्य असते, जेव्हा तुमचे रक्त चांगले पंप होत असते, तेव्हा तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. नियमित प्रेमळ स्पर्श हा भावनिक आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे, आनंद वाढवणे यांसाठी फायदेशीर ठरतो. त्यासाठी ऑक्सिटोसिन हार्मोन हा महत्त्वाचा घटक आहे.

मिठीसाठी चांगला मूड

ज्याला मिठी मारली जाते तो देखील चांगल्या मूडमध्ये असला पाहिजे. खरं तर, तज्ज्ञ म्हणतात की मिठी मारण्याचे फायदे स्वीकारणाऱ्यापेक्षा देणाऱ्यासाठी जास्त आहेत. आपल्याला जगण्यासाठी चार मिठ्यांची, आयुष्य जपण्यासाठी आठ व आयुष्य वाढण्यासाठी १२ मिठ्यांची गरज असते.” मिठी ही भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी शारीरिक स्पर्शाचं महत्त्व सांगते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिठी मारण्याच्या फायद्यांबद्दल तुम्ही खुले संभाषण किंवा चर्चा करणे महत्त्वाचे आहे. मिठी मारणे हे केवळ भावना व्यक्त करण्याचे माध्यम नसून, ते मानसिक आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे व नातेसंबंध दृढ करणे यांसाठी एक प्रभावशाली पर्याय आहे.