03 August 2020

News Flash

क्रांतिकारकांचा नेता

अर्नेस्टो चे गव्हेरा हे केवळ क्युबातच नव्हे तर साऱ्या जगात विख्यात असे नाव आहे. जगभरातील क्रांतिकारकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तरुणांना चे गव्हेरा हे नाव माहीत

| December 22, 2013 01:01 am

अर्नेस्टो चे गव्हेरा हे केवळ क्युबातच नव्हे तर साऱ्या जगात विख्यात असे नाव आहे. जगभरातील क्रांतिकारकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तरुणांना चे गव्हेरा हे नाव माहीत नाही असे सहसा होत नाही. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या सर्वाना- विशेषत: तरुणांना- चे गव्हेरा हा त्यांचा स्फूर्तिदाता वाटतो, आधारस्तंभ वाटतो. लॅटिन अमेरिकेतल्या या क्रांतिकारकाने अमेरिकेच्या दडपशाहीला न जुमानता आपल्या देशाचे रक्षण केले. साम्राज्यशाहीविरुद्ध आणि भांडवलशाहीविरुद्ध चे गव्हेरा यांनी दिलेला लढा या पुढच्या पिढय़ांना प्रेरणा देत राहीलच. त्याचे हे छोटेखानी चरित्र ते काम करते.
 ‘अर्नस्टो चे गव्हेरा’ – अरविंद रेडकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – ११४, मूल्य – १२० रुपये.

कादंबरीमय रामचरित्र
ही मर्यादापुरुषोत्तम मानल्या जाणाऱ्या रामावरची कादंबरी. रामाचं राज्य ‘रामराज्य’  आणि राम हा अहिंसेचा पुरस्कर्ता होता असंही रामायण सांगतं. हे सूत्र पकडून लेखिकेने तरुणांसाठी या कादंबरीचं लेखन केलं आहे. राम स्वत:च या कादंबरीचा नायक असून तोच निवेदकही आहे. म्हणजे रामाची गोष्ट रामच सांगतो. ‘रामराज्य’ हा युटोपिया आहे. पण तो अनेकांना भुरळ घालतो. रामावरची ही कादंबरी रामायण आवडणाऱ्यांना आवडेल. महाभारत आवडणाऱ्यांना तितकीशी आवडणार नाही. आणि मानवी उत्क्रांतीचं भान असणाऱ्यांना कदाचित अवाचनीयही वाटू शकेल.
‘पुरुषोत्तम’ – मेधा इनामदार, उन्मेष प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ४०६, मूल्य – ४०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2013 1:01 am

Web Title: multipal book review 3
Next Stories
1 भवनातील नाटकांचे धुमारे
2 जगणं बदलवणारं पुस्तक
3 सलामत दातांग
Just Now!
X