राहुल देशपांडे
‘‘आयुष्यात १ तास ४९ मिनिटं निवांत जगायचं असेल तर तुमच्या घरच्या आवडत्या कोपऱ्यात मस्त बसावं… कानाला हेडफोन लावावेत आणि निवांतपणे ‘अमलताश’ चित्रपट पाहावा… खूप सुखद आनंद तुम्हाला भेटेल.’’ – एक प्रेक्षक

‘‘खूप सुखद आनंद तुम्हाला मिळेल,’’ असं ‘अमलताश’ पाहणाऱ्या या प्रेक्षकाला म्हणायचं असेल . यातील गमतीचा भाग सोडा, पण ही प्रतिक्रिया वाचली आणि त्या व्यक्तीला जाऊन मिठी मारावी असं वाटलं. अशा अगणित प्रतिक्रिया नमूद करू शकतो अशा असंख्य प्रतिक्रिया प्रेक्षकांनी यूट्युबवर दिल्या आहेत. परवा सकाळी उपेंद्र लिमयेचा अचानक फोन आला… यूट्युबवर ‘अमलताश’ बघितल्यानंतर. इतका भारदस्त आवाज जेव्हा माझ्या अभिनयाविषयी बोलत होता, मी पार्किंगमध्ये शांतपणे उभा राहून सगळं मनापासून ऐकत होतो. त्याने लगेच आम्हाला यूट्युबवर १० हजार रुपये देणगी म्हणून दिलेदेखील! तरीसुद्धा सगळे विचारत आहेत- ‘‘यूट्युबच का?’’! सांगतो…

Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Loksatta Lokrang Comfort Food Hapus Mango Market
बारमाही : असले जरी तेच ते…
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Anjali Damania post About Walmik Karad
Anjali Damania : अंजली दमानियांनी पुन्हा उपस्थित केले आठ प्रश्न; “वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक? गंभीर गुन्हे दाखल होऊनही…”
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

२०१७ मध्ये, फक्त पाच लाख रुपये बजेट घेऊन चित्रपट बनवायला निघालो. जाणकार लोकांनी आम्हाला लगेच समजावलं की, इतके कमी पैसे तर फक्त एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी लागतात. फारतर शॉर्टफिल्म होईल- तीपण फक्त १ ते २ मिनिटांची. सारासार विचार केल्यावर जरा भानावर येताच सगळे मित्र एकत्र आलो आणि आम्ही ३० दिवसांचं बजेट उभं केलं. लोकेशनची निवड केली, कास्टिंग ठरवलं आणि ओघात गाणीसुद्धा तयार होत गेली. ‘‘एवढ्या छोट्या वाड्यात चित्रीकरण होऊ शकत नाही, सिंक साऊंड नको, पेठेत लाइव्ह गाणी रेकॉर्ड नाही होऊ शकत.’’….पण आम्ही ठाम होतो की चित्रपट असाच करायचा आणि विश्वासानं आम्ही तो केला. गाणी, संगीत नाटक, चित्रपट ही अभिव्यक्त ( expression) कला आहे, आणि ती सादर करताना घाबरून कसं चालेल? खूप खूप कसरत करावी लागली, पण आम्ही ‘अमलताश’ पूर्ण केला. खूपच मजा आली खरं तर!

हेही वाचा : क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

नकार हा तर एखाद्या प्रक्रियेचाच भाग आहे. पुण्यामध्ये बनलेला चित्रपट, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलने (पिफ) नाकारला. पण मजेची गोष्ट अशी की इटलीच्या ‘ओनिरे फिल्म फेस्टिव्हल’( Oniros Film Festival) मध्ये चित्रपटाला ‘बेस्ट रोमॅण्टिक फिल्म’ पुरस्कार मिळाला. त्यानंतर मुंबई फिल्म फेस्टिव्हल ( MAMI) मध्ये दाखविण्यात आला आणि तिथला प्रतिसाद पाहून व्हायकॉमने पार्टनरशिपचा प्रस्ताव मांडला. एकत्रपणे चित्रगृहांत चित्रपट प्रदर्शित करायचा करार केला. व्हायकॉमनं त्यांच्या धोरणानुसार ‘अमलताश’सारख्या रोमॅण्टिक चित्रपटासाठी मार्च २०२० हे साल योग्य असं ठरवलं. पण मार्च २०२०मध्ये जगात एकच चित्रपट आला ‘कोव्हिड-नाईण्टीन’- कोणाचीही परवानगी न घेता! अख्खं जग बदललं, त्यात व्हायकॉमही बदललं. त्यांच्या नवीन नेतृत्वचमूने आमच्याशी संवाद बंदच केला, तेही दोन वर्षे वाट पाहायला लावून… चित्रपटात माझ्या भाचीची भूमिका करणारी डिंपलसुद्धा शाळा संपवून कॉलेजमध्ये गेली. वेळ कोणासाठी थांबत नसते आणि मलाही शांत बसायची सवय नाही. आणि म्हणून आधीचे सगळे करार रद्द करून आम्ही चित्रपट स्वतंत्रपणे प्रदर्शित करायचा असं ठरवलं आणि ८ मार्च २०२४ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्येमध्ये प्रदर्शित झाला. तो ५० दिवस भरघोस प्रतिसाद मिळून चालला. आता ओटीटी/टीव्हीच्या फलाटांवर कधी? हा प्रश्न साहजिकच होता.

‘सॅटेलाइट राइट्स’ म्हणजे चित्रपट टीव्हीवर दाखविण्याचे हक्क. जेव्हा आम्ही संबंधित लोकांशी संपर्क केला, तेव्हा त्यांच्याकडून ‘स्वयंपाकघरातील बाईदेखील हा चित्रपट का बघेल? सांगा बरं तुम्ही…’ हा प्रश्न आला. ‘मला चित्रपट खूप आवडलाय, पण सामान्य माणसाला झेपेल का?’ अशीच चर्चेची सुरुवात होती.

असो. टीव्ही अनेक वर्षं व्यवस्थित चालू आहे आणि ते व्यवस्थित त्यांचा कंटेंट आणि व्यवसाय सांभाळत आहेत, त्यामुळे मी त्यांना काय बोलणार?

त्याच वेळी, ओटीटीच्या अनेक यंत्रणांशीही संपर्क सुरू केला. ओटीटी म्हणजे Over- The- Top. म्हणजेच नेटफ्लिक्स, अॅमेझॉन इत्यादी प्लॅटफॉर्म्स थिएटर्सच्या Over- The- Top मिळणाऱ्या डील्स आता चित्रपटांसाठी प्रायमरी डील्स होऊन बसल्या आहेत. या ओटीटी नियंत्रकांनी आधी आम्हाला सांगितलं की चित्रगृहात प्रदर्शित झालेला नसेल तर आम्ही चित्रपट घेत नाही. नंतर सांगितलं, ‘‘अच्छा, प्रदर्शित झालेला आहे का? पण मराठी चित्रपट आता आमच्या निकषांमध्ये बसत नाहीत.’’ मला वाटायला लागलं की यांचा निकष म्हणजे ‘अमलताश’ सोडून दुसरा कुठलाही. शेवटी प्रत्येक चित्रपट सगळ्यांनाच आवडेल असं कधीच होत नाही. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हॉटस्टार, सोनी लिव्ह यांना चित्रपट बघायलासुद्धा वेळ नव्हता. मध्यस्थांमार्फत (एजंट) ते चित्रपट बघतील असं सांगितलं गेलं. आता उरलेल्या ओटीटी फलाटांवर तुम्ही जितके मराठी चित्रपट बघता, (नाहियेत जास्ती), त्यातले जास्तीत जास्ती चित्रपट ‘Pay per view’ प्रमाणे चालतात. म्हणजे जेवढ्या जास्ती वेळा तो चित्रपट पाहिला जाईल तेवढे पैसे निर्मात्यांना मिळतील. आता हाच एक मार्ग आहे मराठी चित्रपट ओटीटीवर दाखवले जाण्यासाठी. पण त्यांचे रेट्स, त्यांचे शेअर्स याबाबतीत कोणतीही पारदर्शकता नाही. आणि ओटीटी आपल्याला pay- per- view प्रमाणे जे पैसे देईल, त्यात मध्यस्थाचा हिस्सा असतो. इतका की आता या मध्यस्थांच्या स्वत:च्या कंपन्या आहेत. इतकं करूनही तुमचा चित्रपट ओटीटीवर आला तरी ओटीटी तुमच्यासाठी ‘शून्य’ जाहिरात करते. तुम्ही स्वत:च तुमच्या चित्रपटाचे जाहिरातदार अशी अवस्था. त्यांचा सहभाग नसल्यानं चित्रपट पाहिला जाईल याची खात्रीदेखील नाही. त्यात त्यांची भौगोलिक गणितं. भारतातील मध्यस्थ वेगळा, अमेरिका, इंग्लंड, पूर्व आशियातला वेगळा. या सर्व खासगी कंपन्या आहेत आणि त्या कोणालाही बांधील नाहीत. त्यांना चित्रपटावर कलाकुसर करण्याविषयी फार प्रेम नाही. कंटेण्ट किती मिनिटे पाहिला जातो आणि त्यांच्या अॅपमध्ये जास्तीत जास्त वेळ लोक कसे थांबतील हेच त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं. आता अनेक लोक सांगत आहेत की, तुम्ही हा विषय सरकारकडे न्या, पण मला वाटतं, नको. ही आपली लढाई आहे, निर्माते ( creators) विरुद्ध चित्रपट प्रदर्शित करणारे ( presenters) यांच्यातली. महाराष्ट्र सरकार चित्रपटांना अनुदान देऊन मोठी मदत करत आहे आणि ती पुरेशी आहे.

हेही वाचा : शांत काळोखाचे तुकडे

हे सगळे मुद्दे सांभाळत फक्त प्रतिष्ठेसाठी नावाजलेल्या ओटीटी फलाटांवर येण्यासाठी अजून वेगवेगळे प्रयत्न करत राहायचे हे काही पटलं नाही आणि म्हणूनच यूट्युब.

करोनाकाळात सुरू केलेला विरंगुळा म्हणजे माझं यूट्युब चॅनेल, गेली काही वर्षे स्वतंत्रपणे विस्तारत गेलं. कोणी गेटकीपर नाही, कोणी प्रोग्रॅमिंग एक्झिक्युटिव्ह नाही, कोणाच्या परवानगीची गरज नाही. मला आवडणाऱ्या गोष्टी मी करत गेलो. प्रेक्षक ते एन्जॉय करत गेले आणित्यातूनच ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ची निर्मिती झाली. ६ लाख फॉलोअर्स असलेलं हे चॅनेल हाताशी असताना तिथेच ‘अमलताश’ प्रदर्शित करू असं ठरलं. इथे आकडेवारीबाबत पूर्ण पारदर्शकता, मध्ये कोणी मध्यस्थ नाही, ज्याला चित्रपट आवडतो तो या सुंदर कलाकृतीबद्दल ‘धन्यवाद’ सांगतोय, ज्याला नाही आवडत तो ‘फ्लॉप’ म्हणतो, काही लोक या सुंदर तरल चित्रपटाला भावूक होऊन देणगी देतायत. ‘कमेंट्स’ हे एक त्वरित प्रतिक्रियेचं वेगळं विश्व बनलं- तेही कुठल्याही भौगोलिक बंधनाशिवाय… जणू संपूर्ण जग यात सामील झालंय… कुठल्याही आडकाठीशिवाय!

अमेरिकन चित्रपट निर्माता डेव्हिड लिंच म्हणतो की ‘‘ स्पीलबर्गचे चित्रपट लाखो लोक पाहतात, माझा चित्रपट हजारो लोक पाहतात… पण पाहतात…’’ आपण चित्रपट तयार करतो ते कशासाठी? तो लोकांनी पाहावा म्हणून. आवडला, नाही आवडला हा नंतरचा प्रश्न. पण चित्रपट निर्मितीचा प्रयत्न सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे, चित्रपट बनवणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. तुम्हाला चित्रपट बनवायचा आहे का? मग कोणासाठीच थांबू नका… मनाची तयारी करा आणि बनवा चित्रपट. नकार हा तर एखाद्या प्रक्रियेचा भाग आहे, निराश न होता प्रयत्न करा. काहीतरी वाट नक्की सापडते. आत्तापासूनच तुमचा स्वत:चा प्लॅटफॉर्म तयार करा, आजचं जग स्पर्धेचं आहे, घाबरू नका आणि बिनधास्त भिडा.

जेव्हा कोणाच्याही पाठिंब्याशिवाय मी इथे आलो तेव्हा स्टुडिओजच्या नकारांनी परावृत्त थोडाच होणार होतो? १४ डिसेंबर २०२४ला आम्ही ‘अमलताश’ यूट्युबला अपलोड केला, तोही कुठल्याही जाहिरातीविना. फक्त ३ आठवड्यांमध्ये २,५०,००० व्ह्यूज आणि १,६०० प्रतिक्रिया… आणि हो काही लोकांनी दिलखुलासपणे अमलताशला दिलेल्या देणग्या… ही तर फक्त सुरुवात आहे. ‘‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’’ .

हेही वाचा : बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू

मराठी प्रेक्षक गेला कुठे?

सिनेमाचा मराठी प्रेक्षक नक्की काय बघतो? दक्षिणेतल्या गल्लाभरू आणि कलात्मक अशा दोन्ही सिनेमांवर त्याचे प्रेम अचानक वाढले. सध्या ‘ओटीटी’चा सोस अथवा ‘टोरंट’च्या मोफत मनोरंजनाच्या आसऱ्यावर त्याची दृश्यभूक पूर्ण होते. दक्षिणी सिनेमा (किंवा हॉलीवूडपटदेखील) थिएटरमध्ये पैसे मोजून जाणाऱ्या त्यांच्या-त्यांच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात. मग हा नियम मराठी चित्रपटांबाबत का पूर्ण होत नाही? सिनेमा कितीही उत्तम बनवला तरी वितरण यंत्रणा मराठी चित्रपटांसाठी अनुकूल नाही, याबाबत निर्मितीत सहभागी असलेल्या दोघांचे अगदीच ताजे अनुभव. अनंत अडचणी पार करीत आपला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रदर्शनाचे पर्यायी मार्ग वापरले. मुद्दा हा आहे की, आपल्याच भाषेतील चांगला चित्रपट गाजावा आणि सर्वदूर जावा यासाठी मराठी प्रेक्षक त्याच्या पाठीशी केव्हा उभे राहणार?

deshpande.rahul@gmail.com

Story img Loader