04 August 2020

News Flash

सावत्र भावाच्या भाजप प्रवेशाने पंतप्रधानांना दु:ख

सावत्र भाऊ दलजितसिंग कोहली याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपल्याला दु:ख झाल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

| April 27, 2014 01:55 am

सावत्र भाऊ दलजितसिंग कोहली याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपल्याला दु:ख झाल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
दलजितसिंग यांच्या निर्णयामुळे आपल्याला दु:ख झाले, मात्र आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही, ते सज्ञान आहेत, असे डॉ. सिंग यांनी वार्ताहरांना सांगितले. पद्म पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.
अमृतसर येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दलजितसिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात मोदी लाट नाही, असे मत डॉ. सिंग यांनी व्यक्त केल्याच्या पाश्र्वभूमीवर लगेचच दलजितसिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. यूपीए-३ ही अशक्य बाब नाही, काँग्रेस केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असेही डॉ. सिंग म्हणाले. दलजितसिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना धक्का बसल्याचे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

प्रवेशाचा मुद्दा अगदीच गौण -चिदम्बरम
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सावत्र भावाने भाजपमध्ये प्रवेश केल्याचा मुद्दा किरकोळ असल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. भाजपमध्ये घाणेरडे राजकारण करणारा विभाग अद्यापही कार्यरत आहे का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2014 1:55 am

Web Title: pm saddened by step brothers decision to join bjp
Next Stories
1 राजनाथ सिंग यांना तिवारींकडून आशीर्वाद
2 भाजप व्यक्तिकेंद्रित विचारामध्ये गुरफटला – शुक्ला
3 दाऊदच्या प्रश्नावरून गृहमंत्र्यांवर मोदींची टीका
Just Now!
X