News Flash

१३२८ करोना मृत्यू लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार? फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल

देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर कठोर शब्दात टीका

१३२८ करोना मृत्यू लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. दोन ट्विट करुन त्यांनी ठाकरे सरकारला जाब विचारला आहे. मुंबईत ८६२ मृत्यू आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ मृत्यू आज जाहीर करण्यात आले. एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे करोना मृत्यू म्हणून जाहीर करण्यात आले.

माझी राज्य सरकारला विनंती आहे की या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता गेले तीन महिने ही आकडेवारी लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:54 pm

Web Title: 1328 covid19 deaths in mumbai and state were declared we demand strict action against all those who are responsible says devendra fadanvis scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात दमदार पाऊस; शेतांमध्ये साचले पाणी, शेतकरी सुखावला
2 यवतमाळ : दारव्हा येथे १२ जणांना करोनाची लागण, एकाचा मृत्यू
3 धक्कादायक! यवतमाळमध्ये अचानक आलेल्या पुरात मृतदेह गेला वाहून
Just Now!
X