News Flash

प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला बिग बींचा मदतीचा हात

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमानंतर बिग बींनी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना 25 लाख रुपयांची देणगी दिली. स्वतःच्या देणगीचा त्यांनी कौन बनेगा करोडपती

समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे हे नुकतेच सोनी वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी झाले होते.

महानायक अमिताभ बच्चन यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमानंतर बिग बींनी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना २५ लाख रुपयांची देणगी दिली. स्वतःच्या देणगीचा त्यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला नाही, असे प्रकाश आमटेंनी सांगितले.

समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे हे नुकतेच सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सहभागी झाले होते. आमटे दाम्पत्याला मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ते आरोग्य सेवाही देत आहेत. त्यांच्या या कार्याला बिग बींनीही सलाम केला. या कार्यक्रमात त्यांनी २५ लाख रुपये जिंकले. या कार्यक्रमाबाबत आणि अमिताभ बच्चन यांच्या मनाचा मोठेपणा प्रकाश आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितला.

अमिताभ बच्चन यांनी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी २५ लाखांची देणगी दिली, असे प्रकाश आमटेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. कार्यक्रम झाल्यावर त्यांनी ही देणगी दिली. महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात त्यांनी हे पैसे जमा केल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम दूरवर जाऊन पोहोचले. महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील जनतेपर्यंत हे कार्य पोहोचले. गडचिरोली जिल्ह्यात यापुढे संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 10:26 am

Web Title: amitabh bachchan donates 25 lakhs to social workers prakash amte lok biradari project
Next Stories
1 चित्र रंजन : भानावर आणणारी गोष्ट
2 चित्र रंजन : युद्ध नसलेली युद्धकथा
3 बॉलिवूडच्या राणीचा असाही थाट
Just Now!
X