06 July 2020

News Flash

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करा

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा शहराच्या नामांतराचा प्रश्न उचलला आहे. औरंगाबादला शिवसैनिक संभाजीनगर असे संबोधतात.

| March 23, 2015 01:39 am

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा शहराच्या नामांतराचा प्रश्न उचलला आहे. औरंगाबादला शिवसैनिक संभाजीनगर असे संबोधतात. हेच नाव सरकारने अधिकृत करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे सांगत पालकमंत्री रामदास कदम यांनी शहरातील गुंठेवारीचा प्रश्न नियमानुकूल केल्याची माहिती जाहीर सभेत दिली.  विकासकामावर होणारी टीका लक्षात घेता शिवसेनेने पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला आहे. खासदार खैरे यांनीही भाषणात नामांतराचा मुद्दा कसा चर्चेत आला, त्यावर कशी कार्यवाही झाली, ते प्रकरण न्यायालयीन कसे झाले, याची माहिती दिली.

युती होणार!
 महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  भाजपकडूनही अधिक जागांसाठी मागणीचा रेटा वाढलेला आहे. मात्र, पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन-चार जागा इकडेतिकडे, पण युती होईलच, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 1:39 am

Web Title: change aurangabad name as sambhaji nagar ramdas kadam
Next Stories
1 नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा
2 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी
3 जल संरक्षणातून आरोग्य रक्षण करता आले याचा आनंद – डॉ. राजेंद्रसिंह
Just Now!
X