05 March 2021

News Flash

या ठिकाणी आहेत कोव्हिड-१९ निदान व तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज यादी जाहीर केली आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

राज्यात करोनाचं थैमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर  करोनाचं निदान करणाऱ्या आणि तपासणी प्रयोगशाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज (सोमवार) ही यादी जाहीर केली आहे.

ही यादी पुढीलप्रमाणे –

१. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.

२. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा – ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई

३. पालघर जिल्ह्याकरिता – उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई

४. सातारा जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

५. पुणे जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे

६. अहमदनगर जिल्ह्याकरिता व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) – प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे

७. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली

८. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

९. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

१०. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

११. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

१२. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा – या जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 6:31 pm

Web Title: coronavirus district wise testing labs declared by minister amit deshmukh jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “राज्यात पूर आला तेव्हा फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची कल्पना का सुचली नाही?”
2 चंद्रपुरात दिवे लावा कार्यक्रमात फटाक्यांची आतशबाजी, दोन घरं पेटली
3 Lockdown: लोकसत्तेच्या वृत्ताची दखल; गतिमंद कविता आणि तिच्या बाळाला मिळालं हक्काचं घर
Just Now!
X