महत्त्वकांक्षी जिल्ह्यामध्ये सामाविष्ट असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून कोविड चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. नीति आयोगाच्या उच्चअधिकार प्राप्त समूहाच्या १५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे चाचणी केंद्र महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. याचा लाभ स्थानिक कोरोनाग्रस्त रूग्णांना होणार आहे. सध्या रूग्णांची चाचणी करण्यासाठी लातूर येथे नमुने पाठविण्यात येत आहेत. उस्मानाबाद येथे चाचणी केंद्र सुरू झाल्यानंतर दर दिवशी १०० नमुने तपासणी केले जातील.

देशभरात कोरोनाचा वाढते संक्रमण लक्षात घेता केंद्र सरकारने उच्चस्तरीय समूह ६ (ईजी-६) ची स्थापना केली आहे. नीति आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली हा समूह कार्य करीत आहे. यामध्ये नागरिक समाज संस्था, गैर सरकारी संस्था, उद्योग, विकास आणि जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण संस्थांचा सहभाग आहे. या सर्व संस्थाचा समन्वय साधून अती प्रभावित करोना जिल्ह्यांतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामध्ये सहयोग आणि मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका सहभागी संस्था निभावत आहेत. यामध्ये करोनाग्रस्त रूग्णांना वेगळ्या शिबिरांमध्ये ठेवणे, त्यांना नियंत्रित करणे, नियंत्रण कक्ष सांभाळणे, घरी जाऊन अन्नधान्य तसेच शिजवलेले अन्न वितरित करणे, लॉकडाउनच्या काळात बचत गटांकडून मास्क, सॅनिटाइजर बनविण्यासाठी प्रोत्साहन देणे, निर्जंतुकीकरण साहित्य निर्माण करण्याचे काम देण्यात आलेले आहे