जिल्ह्यात मदत कक्ष उभारणार;  सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी

पालघर: करोना रुग्णालयात रुग्णांच्या उपचारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करोना रुग्ण व आरोग्य यंत्रणेचा समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यात मदत नियंत्रण कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येणार आहे.तसेच सर्व करूनही उपचार केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुमोटोअंतर्गत दिलेल्या आदेशानुसार ही अंमलबजावणी प्रशासनाला करावयाची आहे.

करोना बाधित रुग्णांना जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय करोना उपचार केंद्रात विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा आरोग्य संस्थांनी रुग्णांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जाव्यात व यावर देखरेख तसेच नियंत्रण व समन्वय रहावे यासाठी प्रशासनामार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे उपचार केंद्रांमध्ये रुग्णांच्या उपचारासंबंधित पारदर्शकता व समन्वय साधता येणार आहे.

या उपचार केंद्रांमध्ये रुग्णांना उपचारासह नातेवाईकांना संपर्क करण्यात अडचण निर्माण झाल्यास रुग्णांच्या एका नातेवाईकास या केंद्रांमध्ये समन्वयासाठी उपचार केंद्रांनी निश्चित केलेल्या ठिकाणी थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची पीपीई किट घालून रुग्णाचा जवळ जाण्याची परवानगी दिलेली . त्यामूळे रुग्णांच्या उपचारासंबंधीची विचारपूस व रुग्णांना लागणारम्य़ा इतर खासगी सुविधा पुरविण्यात यामुळे मदत होईल. करोना रुग्णांना आवश्यक ती मदत प्राप्त व्हावी व त्यांचा समन्वय एका ठिकाणाहून साधता यावा यासाठी मदत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याचेही आदेश दिले आहेत.

 

टास्क फोर्सची

बैठक बुधवारी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाची अंमलबजावणी तसेच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी जिल्ह्यात करोना परिस्थिती हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सची बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था तसेच मदत नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात विशेष चर्चा होणार आहे त्यामुळे या मदत कक्षाद्वारे रुग्ण व आरोग्य सेवेचा समन्वय साधण्यात पुरेपूर उपयोग होणार आहे.

मदत नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांच्या तक्रारी सोडवण्यास मदत होईल तसेच यामुळे आरोग्य यंत्रणेची गुणवत्ता सुधारून रुग्ण व आरोग्य यंत्रणेचा योग्य तो समन्वय राहील.

– डॉ.दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी