News Flash

धक्कादायक! पिंपरीत पित्याने दोन मुलांची हत्या करुन केली आत्महत्या

पिंपरी-चिंचवड मधल्या ताथवडे भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्यानेच पोटच्या दोन मुलांची हत्या करून नंतर स्वतःहा आत्महत्या केली.

पिंपरी-चिंचवड मधल्या ताथवडे भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्यानेच पोटच्या दोन मुलांची हत्या करून नंतर स्वतःहा आत्महत्या केली.

पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर हा मन सून्न करुन सोडणारा प्रकार सामोर आला. दीपक बरमनने (३५) पोटच्या दोन मुलांची शुभम आणि रुपमची गळा आवळून हत्या केली. शुभम १० वर्षांचा तर रुपम आठ वर्षांचा होता.  त्यानंतर दीपकने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. घराच्या समोर असलेल्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पती-पत्नी नोकरीला होते. दीपकने इतके टोकाचे पाऊल का उचलले ? त्यामागे काय कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 3:40 pm

Web Title: in pimpri father killed two childrends then killed self
Next Stories
1 आरक्षणासाठी मराठा बांधवांचे २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण
2 पुण्यात शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू
3 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, जखमी चालकाची अर्ध्या तासाने सुटका
Just Now!
X