यवतमाळ जिल्ह्यात आज तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मृतांमध्ये एका महिलेस दोन पुरूषांचा समावेश आहे. यवतमाळ, पुसद, आणि पांढरकवडा येथे हे मृत्यू झाले. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे. दरम्यान आज दिवसभरात जिल्ह्यात ७९ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १ हजार २२६ इतकी झाली आहे.

सोमवारी मृत्यू झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील कुभारंपुरा येथील ६६ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील महादेव नगर येथील ७५ वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील प्रभात नगर येथील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज पॉझिटिव्ह आलेल्या ७९ जणांमध्ये ३६ पुरुष व ४३ महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील खतीब वॉर्ड येथील दोन पुरुष, पुसद शहरातील गणेश वॉर्ड येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक एक मधील एक महिला, पुसद शहरातील पाच पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक महिला, श्रीरामपूर येथील एक पुरुष, मारेगाव तालुक्यातील काळी दौलत येथील एक महिला, पांढरकवडा शहरातील १३ महिला व नऊ पुरुष, पांढरकवडा शहरातील वैभव नगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील अवधूतवाडी येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील काळे ले-आऊट, वडगाव येथील एक महिला, यवतमाळ शहरातील विश्वकर्मा नगर, पिंपळगाव येथील पुरुष, जामा मशीद वॉर्ड येथील एक पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील पाच पुरुष व आठ महिला, दिग्रस शहरातील पाटीपूरा येथील एक पुरुष, आर्णी शहरातील पाच पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यात विविध कोविड केअर सेंटरमधून आठ जणांना सुट्टी झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूगण आहेत. जिल्ह्यात सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २२६ झाली आहे. यापैकी ७३० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात १२६ जण भरती आहेत.

पांढरकवडा, पुसद, दिग्रस येथील टाळेबंदीत शिथिलता –
पालकमंत्री संजय राठोड यांनी आज प्रशासनाच्याकामकाजाचा आढावा घेतला. त्यांच्या सुचनेवरून यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील संचारबंदीत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही शहरातील बाजारपेठ आज सोमवारपासून सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडण्यास मुभा देण्यात आली. याच धर्तीवर आता पांढरकवडा, दिग्रस आणि पुसद येथील संचारबंदीत शिथिलता देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार आता या तिन्ही शहरातील बाजारपेठसुद्धा उद्या मंगळवारपासून सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडी राहणार आहे.