News Flash

Maharashtra SSC Result 2021 : नापास ०.०५ % मध्ये मोडणारे विद्यार्थी कोणते?

यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून, कोकण विभाग १०० टक्के निकालासह अव्वल ठरला आहे.

Maharashtra SSC Result 2021, SSC Result 2021
४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी, ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. (संग्रहीत छायाचित्र)

यंदा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या, तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत घेत निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. तर, दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. यंदाच्या परीक्षेत ९९.५ टक्के उत्तीर्ण झाले तर उरलेल ०.०५ टक्के अनुत्तीर्ण ठरवण्यात आलेले आहेत.

नक्की पाहा >> Viral Memes : ९९.९५ पास… अरे निकाल आहे की डेटॉल? ती ०.०५ पोरं नापास झालीच कशी?

वर्षभरात काही विद्यार्थी शाळांच्या संपर्कात नव्हते असेच फक्त अनुत्तीर्ण आहेत. एकूण १४०० विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. तर, ४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी, ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे.

Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या परिक्षेत कोकणाची बाजी; राज्यात सर्वाधिक १०० टक्के निकाल

इयत्ता दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (१००%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९९.८४%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ % नेजास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ % लागला आहे.

तसेच, एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये २७ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्र्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 12:24 pm

Web Title: maharashtra ssc result 2021 which students fail in 0 05 percent msr87
टॅग : Ssc Exam
Next Stories
1 SSC Result 2021: ८३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण
2 Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या परिक्षेत कोकणाची बाजी; राज्यात सर्वाधिक १०० टक्के निकाल
3 Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल ९९.९५ टक्के
Just Now!
X