21 September 2020

News Flash

सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन डबे सोडून धावले, थोडक्यात टळला अपघात

डबे न घसरल्याने थोडक्यात टळला मोठा अपघात

औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनवर मोठा रेल्वे अपघात होता होता टळला. अमृतसरहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसचे कपलिंग सकाळी 11.15 च्या सुमारास तुटले. ज्यामुळे या गाडीचे इंजिन डबे सोडून थोडे पुढे गेले. सुदैवाने डबे न घसरल्याने मोठा अपघात टळला. या घटनेमुळे प्रवाशी गोंधळले होते. अखेर काही वेळाने हे इंजिन मागे आणून एक्स्प्रेसच्या डब्यांना जोडण्यात आले.

या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस अचानक फलाट क्रमांक तीनला बोलावावी लागली. यामुळे प्रवाशांचाही काही प्रमाणात गोंधळ उडाला. सचखंड एक्स्प्रेस ही सुपरफास्ट गाडी आहे. या गाडीच्या इंजिनाची प्रत्येक महत्त्वाच्या थांब्यावर नियमित तपासणी होते. मनमाडहून निघताना इंजिन तपासण्यात आले नव्हते त्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे असे औरंगाबाद रेल्वे कार्यालयाने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 6:04 pm

Web Title: scahkhand express engine running some distance at daultabad station
Next Stories
1 राष्ट्रवादीला धक्का, परभणीतील १३ नगरसेवकांचे राजीनामे
2 पुणे पोलिसांना हादरा; आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर, न्यायालयाची चपराक
3 माझं बरं वाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार ठरवेल – हजारे
Just Now!
X