News Flash

संभाजी भिडे गुरुजी उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला पोहोचले आहेत

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला पोहोचले आहेत. जलमंदिर पॅलेस येथे ही भेट घेण्यात आली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उदयनराजे यांनी मात्र ही घरगुती भेट असल्याचं सांगितलं आहे. खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं बोललं जात आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळावा यासाठी उदयनराजे प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आता साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ते हा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या या प्रयत्नांना जर यश आले तर शरद पवारांना हा मोठा धक्का असू शकतो. शिवाय हक्काचा सातारा जिल्हा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्यात जमा होऊ शकतो.

उदयनराजे भाजपात आल्यास आनंदच होईल-मुख्यमंत्री
उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले भाजपात आले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. भाजपात यायचं की नाही सर्वस्वी निर्णय उदयनराजे यांचाच आहे मात्र ते भाजपात आल्यास आम्हाला निश्चितपणे आनंद होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 2:15 pm

Web Title: shiv pratishthan sambhaji bhide meets udyanraje bhosale in satara sgy 87
Next Stories
1 Maharashtra SSC supplementary result 2019 :दहावी फेरपरीक्षेत २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, असा पाहा निकाल
2 सोलापूर – शिवशाही बसचा भीषण अपघात, एक ठार; ११ जखमी
3 जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापना करण्याचा विधी आणि मुहूर्त
Just Now!
X