22 September 2020

News Flash

इचलकरंजीत उपसरपंचाची हत्या; धारदार शास्त्राने वार करून रस्त्याच्याकडेला फेकला मृतदेह

पैशाच्या देवाणघेवाणीतून घटना घडल्याची शंका

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

इचलकरंजी जवळ कोंडीग्रे येथे रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती ही शेजारच्या गावची उपसरपंच असल्याचे कळते. आर्थिक कारणाने हे हत्याकांड घडले असावे असा प्रथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विनायक माने असे मृत तरुणाचे नाव असून तो खोतवाडी गावचा उपसरपंच आहे. खोतवाडी गावामध्ये ही माहिती समजताच माने याच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जयसिंगपूर पोलिसांना माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, विनायक माने यांचे रात्री उशिरा मित्रांसोबत खोतवाडीजवळच्या कोल्हापूर धाब्यावर जेवण झाले होते. त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास त्याचे आईशी फोनवरून संभाषणही झाले. दरम्यान, आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:01 pm

Web Title: vice sarpanch brutally murdered with sharp weapon at ichalkaranjee
Next Stories
1 लग्नासाठी तयार होत असताना नवरदेवाचा मृत्यू; मिरज येथिल घटना
2 पारपत्र पडताळणीसाठी पोलीस अर्जदाराच्या घरी
3 छतावरील पावसाचे पाणी साठविणारे संयंत्र शासनाकडून स्वीकृत
Just Now!
X