News Flash

…हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे; कृपया खोटं बोलणं थांबवा – सचिन सावंत

ऑक्सिजन पुरवठ्याच्या फडणवीसांच्या दाव्यावरून साधला आहे निशाणा

संग्रहीत

राज्यात सध्या कोरनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असल्याने, आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्ससह रेमडेसिविर इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. परिणामी करोनाबाधिता रूग्णांचे हाल सुरू आहेत. कोलमडत असलेली आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्यसरकारकडून वेळोवेळी केंद्र सरकारकडे मदत देखील मागितली जात आहे. तर, या मुद्यावरून अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. दरम्यान, काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला करण्यात आला असल्याचा दावा केला होता. यावरून आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी सादर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे. कृपया खोटे बोलणे थांबवा. असं सावंत म्हणाले आहेत.

“देवेंद्र फडणवीस, आपण जी यादी दाखवून पंतप्रधान मोदींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.” असा सचिन सावंत यांनी आरोप केला आहे.

तसेच, “तथ्य – महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे 1250 मे.टन आहे. केंद्राच्या मान्यतेने प्राप्त होत असलेला ऑक्सिजन भिलाई ११० मे.टन /दिन बेलारी ५० मे.टन /दिन जामनगर १२५ मे.टन/दिन व्हायजॅग – ६० मे.टन सरासरी ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदा ११० मे.टन आणले आहे.” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

याचबरोबर “एमव्हीए सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत २५००० मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १७५०० मे.टन महाराष्ट्राची क्षमता होती. केंद्राला ७५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन/दिन द्यायचे होते. परंतु ३४५ मे.टन/दिन मिळत आहे. उरलेल्यासाठी वाहतूक अडचण येत आहे. कृपया खोटे बोलणे थांबवा.” असंही सावंत यांनी बोलून दाखवलं आहे.

“महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.” अशी माहिती ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच, याचबरोबर, महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फडणवीस यांनी आभार देखील व्यक्त केले आहे.

“महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा”; फडणवीसांचा दावा!

तर, “ऑक्सिजन तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राकडून मोठा निर्णय ! देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ PSA ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी पीए ‘केअर्स’ मार्फत निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार!” असं देखील भाजपाकडून ट्वटि करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 6:31 pm

Web Title: we do not need modijis favor for this and hence can not thank him for that it is a bluff of modi govt msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘एमबीबीएस’ परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार!
2 नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना
3 VIDEO: करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी शिवसेना आमदाराने मोडली ९० लाखांची एफडी
Just Now!
X