News Flash

चंद्रपुरात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

स्वगृही नॉयलॉन दोरीने गळफास लावून युवकाने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर तालुक्यातील चौगान येथे शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अमोल श्रावण भागडकर (वय २६, रा. चौगान) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरी कोणीही नसताना अमोल याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मृत तरुणाच्या काकाने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला दिली. या माहितीनुसार ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, शनिवारी (२७ जून) सकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन दुपारच्या सुमारास या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अमोलने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे कळू शकले नाही.

या घटनेची नोंद ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मांदाडे व सावसाकडे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 9:58 am

Web Title: youth commits suicide by hanging in chandrapur
Next Stories
1 पालखी सोहळ्याबाबतचा शासननिर्णय सर्वांच्या हिताचा, भाविकांनी सहकार्य करावे – गृहमंत्री
2 ‘सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालावे’
3 धक्कादायक! नालासोपाऱ्यात तीन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या
Just Now!
X