अकोला : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर ‘स्टेटस’ ठेवल्याने अकोल्यातील एका व्यावसायिकाला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकऱ्यांना निवेदन सादर करून राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने अमरावती येथे एका व्यावसायिकाच्या हत्येची घटना ताजी असतानाच अकोल्यात एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण झाल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला. शहरातील एका व्यावसायिकाने नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे ‘स्टेटस’ ठेवले होते. यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे वाक्य, चित्र नव्हते. तरीही काही युवकांनी त्या व्यावसायिकास त्यांच्या दुकानावर जाऊन मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप विहिंपकडून करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून मारहाण झाल्याचे आढळून आले नसल्याचे शहर कोतवाली पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित तीन ते चार युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.