‘करोना गो, गो करोना गो’ हे कोण म्हणालं होतं असं कुणालाही सांगण्याची गरज नाही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गो करोना गो म्हणताच देशभरात प्रसिद्ध झाले. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी गुढीपाडव्याच्याही त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या.

देशात करोनानं थैमान घातलं. करोनाच्या उद्रेकानंतर दीड महिन्यातच देश लॉकडाउनमध्ये गेला. देशात सध्या ६०२ रूग्ण करोनानं बाधित झाले आहेत. तर हजारो संशयित आहेत. देशात दहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशी सगळी परिस्थिती असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी करोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘गो करोना गो’चा नारा दिला. तो महाराष्ट्रासह देशभरात पोहोचला.
आता आठवलेंनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा तीन ओळींची कविता शेअर करून इतिहास घडवण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले आठवले?

आज आहे गुढी पाडवा
कोरोना ला आडवा
आणि सर्वांनी इतिहास घडवा!
असं ट्विट करून आठवलेंनी शुभेच्छांबरोबर करोनाविरोधात लढा देण्याचं आवाहन केलं आहे.

करोना आणि आठवलेंच्या कविता-

अब आप बिलकुल मत रोना
14 एप्रिल के बाद चला जायेगा कोरोना!
कोरोना से मत डरोना
कोरोना को जलदी मारोना
कोरोना ने दुनिया को दिया है धोका
हम करेंगे उसका खोका
कोरोना गो गो ; कोरोना गो गो
कोरोनाच्या आयचा घो घो घो!

कोरोना आला आहे आपल्या दारी
आपण थांबा आपल्या घरी
आता करू नका कोणी पंढरीची वारी
नरेंद्र मोदींचा लॉक डाऊन निर्णय आहे लय भारी
नरेंद्र मोदींनी दिलेला आदेश पाळा
घराच्या बाहेर जाणे टाळा
कोरोना व्हायरस ला घाला आळा
कोरोनाला दिसेल तिथे जाळा
जान है तो जहान है
लाईफ अपना महान है

करोना गो ये मैने दिया था नारा,
इसलिए जाग गया था भारत सारा,
करोना जैसे चमक रहा है १०२ देशो मै तारा,
एक दिन हम बजादेंगे करोना के बारा.