शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पोहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट झालेली नाही.”

भाजपा नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभागणीची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर पुणे मनपाचे दोन भाग होणार का यावर चर्चांना उधाण आलंय.

पुणे मनपाचे दोन भाग होणार का?

पुणे मनपाचे दोन भाग होणार का? याबाबत फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, “नवनवीन वादाचे विषय कशाला काढता? जेव्हा पुणे महानगरपालिकेचं विभाजन करायचं तेव्हा करू. आज तरी राज्य सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो हे खरं आहे. मात्र, आज तरी असा प्रस्ताव आलेला नाही.”

हेही वाचा : पुणे महापालिका विभाजनाचा वाद कशाला ? ; फडणवीसांची स्पष्ट भूमिका

“वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे,” असं म्हणत फडणवीसांनी अशी मागणी करणाऱ्यांना सूचक संदेश दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on speculations of meeting with ashok chavan rno news pbs
First published on: 02-09-2022 at 18:01 IST