गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप या दोन गोष्टींवरून जोरदार राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. आधी मंत्रीमंडळ विस्ताराला झालेला उशीर चर्चेत राहिला. त्यानंतर खातेवाटप लांबल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. अखेर राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत. दरम्यान, या खातेवाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “महत्त्वाची खाती भाजपाकडे, शिंदे गटाला दुय्यम स्थान, सन्मान कमी झाला?” खातेवाटपावरून अमोल मिटकरींची खोचक टीका

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केले आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्हाला जे खाते मिळाले आहे. त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. खरं तर अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार पूर्णपणे झालेला नाही. जेव्हा हा मंत्रीमंडळ विस्तार होईल. तेव्हा आमच्याकडील काही खाती त्यांच्याकडे जातील. त्यामुळे आमच्यात खातेवाटपावरून कोणताही वाद नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ने संभाषणाला होणार सुरुवात, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

पुढचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल, याबाबत विचारले असता ते म्हणाले, की ”मंत्रीमंडळ विस्तार करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. योग वेळ पाहून त्याबाबत निर्णय घेण्यात येईन.”

हेही वाचा – मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!

यावेळी बोलताना त्यांनी भाजपा-शिवसेना युतीच्या अडीच वर्षाच्या फॉर्मुल्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ”एकनाथ शिंदे नेमकं या म्हणाले मला माहिती नाही. मात्र, अडीच वर्षाचा प्रस्ताव कधी ठरलाच नसता. मी हे पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे. कारण सर्व वाटाघाटी मी केल्या होत्या. मात्र, आता त्या गोष्टीला काहीही अर्थ उरलेला नाही. उद्धव ठाकरे जेंव्हा गद्दार, बेईमानी असे शब्द वापरतात. तेव्हा मला त्याचे आश्चर्य वाटतं कारण सर्वात मोठी बेईमानी तर आमच्याशी झाली आहे. आमच्याबरोबरीने निवडून येऊन विरोधकांशी हातमिळवणी करत आहेत, यापेक्षा मोठा विश्वासघात काय असू शकतो.” असे ते म्हणाले.