Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात आधी तीन आरोपींना आणि नंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली. तर या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिला पाहिजे असंही विरोधक म्हणत आहेत. दरम्यान धनंजय मुंडे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित झाले आणि त्यांनी याबाबत उत्तर दिलं.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात निषेध मोर्चाही झाला होता, त्याआधी बीड मध्येही निषेध मोर्चा झाला होता त्या मोर्चात संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवी सहभागी झाले होते.

हे पण वाचा- Sanjay Raut : “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक, आरोपींना वाचवण्यासाठी…”; संजय राऊत यांचा आरोप

वाल्मिक कराड यांचं कनेक्शन काय?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती. दरम्यान वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. त्यावरुनही बरेच आरोप प्रत्यारोप झाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण सातत्याने उचलून धरलं आहे

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा सातत्याने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा मुद्दा लावून धरला आहे. तसंच सर्वपक्षीय नेत्यांनी याच प्रकरणात राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचं विष्णू चाटेचं कनेक्शन काय? तसंच पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे लोकसभेला कशा हरल्या हे देखील सांगितलं आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडे राजीनाम्याच्या चर्चेवर काय म्हणाले?

दरम्यान या सगळ्या घटना घडत असताना धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर धनंजय मुंडेंनीच उत्तर दिलं आहे. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले, “मी आज कॅबिनेटच्या बैठकीसाठी आलो आहे तसंच मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही.”