scorecardresearch

Premium

“मी लेचापेचा नाही”, राजकीय आजारपणाच्या टीकेवर अजित पवारांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काही असेल…”

सध्या विविध जातीजाती वाद सुरू असून प्रत्येकाला आरक्षण हवंय. कोणावरही अन्याय होणार नाही. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आली, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar karjat
अजित पवार काय म्हणाले? (फोटो – संग्रहित छायाचित्र)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे बरेच दिवस ते सक्रिय राजकारणातून बाहेर होते. त्याच काळात मराठा आंदोलन पेटले होते. तसंच, अनेक महत्त्वाचेही मुद्दे चालू होते. या प्रकरणी अजित पवारांची कोणतीही राजकीय प्रतिक्रिया न आल्याने पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यावरून, अजित पवारांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित केलेल्या निर्धार सभेत ते बोलत होते.

सध्या विविध जाती-जातीत वाद सुरू असून प्रत्येकाला आरक्षण हवंय. कोणावरही अन्याय होणार नाही. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आली, असं अजित पवार म्हणाले.

Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
crime of rape cannot be cancelled by settlement
समझोत्याने बलात्काराचा गुन्हा रद्द करता येणार नाही…
modi in rajyasabha
“मला कोणतेही आरक्षण आवडत नाही”; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचलेल्या नेहरूंच्या ‘त्या’ पत्रात काय लिहिले आहे?
nirmala sitaraman
पंतप्रधान मोदी महिलांना गिफ्ट देण्याच्या तयारीत? महिलांना कर रचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता

हेही वाचा >> “आम्ही साधू-संत नाही, अनेक वर्ष…”, कर्जतमध्ये जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “राज्याच्या जनतेला सांगतो की…”

पुढे ते म्हणाले की, एखाद्याचे विचार पटले नाहीत तर विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. मध्ये मला डेंग्यु झाला. मला विकनेस आला होता. डॉक्टरांनी मला काळजी घ्यायला सांगितली होती. त्या पद्धतीने मी काळजी घेतली. पण अनेकांनी म्हटलं की अजित पवारांना राजकीय आजार झाला. मी काही लेचापेचा राहिलो नाही राजकीय आजार व्हायला. जे काही आज असेल ते तोंडावर बोलणारा माणूस आहे.

अजित पवार म्हणाले की, मधल्या काळात काही राजकीय बदल झाले. त्याबाबत बराच उहापोह झाला. सगळ्यांना सांगायचं आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या जिल्ह्यात समुद्रकिनारा आहे. डोंगराळ भाग आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेल्वे गेली आहे. रस्त्यांचं जाळं निर्माण झालं आहे. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हावं. अनेक मह्तत्वाच्या भागांना जोडणारं काम होत आहे. पुणे, नगर जिल्ह्यांतून घाटातून येताना लोकांना त्रास होतो. तेथेही काही व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इथल्या लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I am not lechapecha ajit pawars sharp reply to criticism of political sickness said whatever sgk

First published on: 29-11-2023 at 21:47 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×